महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालयात येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वाम...
महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिनानिमित्त विविध शासकीय कार्यालयात येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ची प्रतिमा सप्रेम भेट
चोपडा : प्रतिनिधी
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
राज्य शासनाच्या परिपत्रकात यंदा 'भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिना' चा जयंती कार्यक्रमामध्ये नव्याने समावेश केला आहे. या निर्णयाचे महानुभाव साधकांसह मराठी सारस्वतानेही स्वागत केले आहे.त्या अनुषंगाने
आज दिनांक ५ सप्टेंबर २०२४ महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय हातेड खुर्द , श्री शिवाजी हायस्कूल व श्री शिवाजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ची प्रतिमा सप्रेम भेट म्हणून देण्यात आली व भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच व ग्रामसेवक व ग्रामपंचायत कार्यालय चे
सर्व सदस्य व पोलीस पाटील व महानुभाव पंथीय ग्रामस्थ आणि गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांना महानुभाव पंथा विषयी माहिती देण्यात आली व भगवान सर्वज्ञ प्रभु चक्रधर स्वामी यांचे महात्म्य सांगितले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला



No comments