कर्तव्य,कर्तृत्व शिस्त हीच माझी जनसेवा अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणे हेच ध्येय- सपोनि विशाल पाटील. सपोनि विशाल पाटील. र...
कर्तव्य,कर्तृत्व शिस्त हीच माझी जनसेवा अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणे हेच ध्येय- सपोनि विशाल पाटील. 
सपोनि विशाल पाटील.
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक :-हेमकांत गायकवाड )
रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन ला दोन महिने पुर्व नियुक्ती करण्यात आलेले कार्यतत्पर कार्यक्षम शिस्तबद्ध शिस्तप्रिय शांतताप्रिय शांत संयमी स्मितभाषी कायद्याने व शिस्तीचे कडक असे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सावदा पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला व सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील 32गावांतील अवैध धंदे वाईकांवर धाडसत्र व कारवायांचा धडाका यामुळे दोन नंबरींचा थरकाप उडाला आहे आठ दिवसांत च सावदा पोस्टेचे हद्दीतील अवैध धंदे सट्टा पेढ्या पत्त्यांचे क्लब गावठी भट्ट्या उध्वस्त करून पन्नीदारु विनापरवाना देशी विदेशी दारुची विक्री करणार्यांना सळो की पळो करून सोडत पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण अवैध धंदे बंद करुन हद्दपार केले आहेत सावदा पोलीस स्टेशन च्या कोणत्याही बीट मध्ये धाड टाकून कारवाई करण्याची परवानगी दिली यामुळे दैनंदिन अवैध धंदे वाईकांवर कारवाई सत्र सुरू आहे दररोज गुन्हे दाखल केली जात असल्याने दोन नंबरींमध्ये भीती पसरली आहे कोणाचीही व कोणत्याही गुन्हेगार यांच्याशी तडजोड हयगय न करता थेट कारवाई होत असल्याने पुर्वी बेफामपणे खुलेआम राजरोसपणे सुरु असलेले अवैध धंदे बंदीसाठी सपोनि विशाल पाटील यांनी पायंडा उचलला असून ते सुपर राऊडी राठोड ठरलेत अवैध धंदे हद्दीतून हद्दपार केल्याने परिसरात सपोनि विशाल पाटील यांचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे यासंदर्भात प्रतिनिधी मुबारक तडवी यांनी त्यांना या संदर्भात वृत्तांकन करीत असतांना विचारले असता अवैध धंदे कायमस्वरूपी
बंद व्हावेत या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले व नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे पोलिस स्टेशन ला न्याय हक्कासाठी येणाऱ्या नागरिकांना नक्कीच न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे प्रशासनात कर्मचाऱ्यांना शिस्त कार्य कर्तव्य कर्तृत्व पारदर्शक गतिमान करण्यासाठी भर दिला जात आहे तसेच जातीय सलोखा बंधूभाव एकात्मता सर्वधर्मसमभाव टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे पोलीस प्रशासनातील कार्यतत्परता कर्तव्यदक्षता सुश्रुतता आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले
No comments