चोपडा महाविद्यालयात ' एक पेड माँ के नाम ' उपक्रमाअंतर्गत विविध वृक्षांची लागवड प्रतिनिधी चोपडा (संपादक :- हेमकांत गायकवाड) चोपडा: ...
चोपडा महाविद्यालयात ' एक पेड माँ के नाम' उपक्रमाअंतर्गत विविध वृक्षांची लागवड
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने *एक पेड माँ के नाम'* उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध वृक्षांची लागवड कऱण्यात आली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी, डॉ.के.एन.सोनवणे,समन्वयक डॉ.एस ए वाघ, सौ. एम.टी.शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री.विशाल पांडुरंग हौसे, सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. के.डी. गायकवाड, महिला सहायक कार्यक्रमाधिकारी सौ. एस. बी. पाटील व राष्ट्रीय सेवा योजना एककातील अनेक स्वयंसेवक उपस्थीत होते. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. वृक्ष लागवडीतून पर्यावरणाचे संरक्षण केले जावे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी आम्रवृक्ष,अशोक वृक्ष, लिंब अशा विविध वृक्षांची लागवड आपल्या आईच्या नावाने महाविद्यालयात केली तसेच केलेल्या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करु असे स्वयंसेवकांनी आश्वासित केले. 'झाडे लावा झाडे जगवा' 'आओ एक पेड लगाये हम', 'वृक्ष हमारे जीवन साथी ' अशा विविध घोषणा राष्ट्रीय सेवा योजना एककातील स्वयंसेवकांनी दिल्या.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजना एककातील या उपक्रमाचे व स्वयंसेवकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

No comments