Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची बदली

  रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची बदली नांदगाव नाशिक येथे झाली बदली   मोहसीन मुबारक तडवी रावेर (संपादक :- हेमकांत...

 रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची बदली

नांदगाव नाशिक येथे झाली बदली 

मोहसीन मुबारक तडवी रावेर

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 रावेर पंचायत समितीच्या बिडीओ दिपाली कोतवाल यांची बदली प्रशासनाने केली आहे.रावेर पंचायत समिती मधील त्यांचा कार्यकाळ अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरला आहे. रावेर पंचायत समितीतील गटविकास अधिकारी  दिपाली कोतवाल यांच्या बदलीचे आदेश महाराष्ट्र शासनाने काल रात्री उशीरा काढले असून त्यांची बदली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समिती येथे केली आहे.

रावेर पंचायत समितीच्या बिडीओ दीपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात 'वैयक्तिक  शौचालय अनुदान योजना' मोठी मुख्यतः वादग्रस्त ठरली. यात सुमारे दीड कोटीहून अधिक रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्र राज्यभर चर्चेचा विषय झाला होता. या वैयक्तिक शौचालय अनुदान भ्रष्टाचार प्रकरणात, कर्मचारी, अधिकाऱ्यांसह ३० च्या जवळपास आरोपींची चौकशी केली गेली व यातील अनेकांना तुरुंगाचीही हवा खावी लागली.तर काहींना फरार व्हावे लागले होते तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रकरणही पोलीस ठाण्यात पोहोचले होते बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरण. शेष फंड प्रकरण, ब्युटीपार्लर योजना अशी अनेक प्रकरणे गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या कार्यकाळात घडल्याने त्यांची कारकीर्द कमालीची वादग्रस्त ठरली.

No comments