Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा पोलीस निवासस्थानाची कायापालट होणार

 सावदा  पोलीस निवासस्थानाची कायापालट होणार "उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राजेश वानखेडे यांचा पाठपुरावा" रावेर प्रतिनिधी मोहसीन मु...

 सावदा  पोलीस निवासस्थानाची कायापालट होणार

"उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राजेश वानखेडे यांचा पाठपुरावा"


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिसांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने त्याचा वापर अनेक वर्षापासून बंद आहे.त्यामुळे येथील पोलिसांना शासकीय निवासस्थाने बांधून मिळावी.याबाबत सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष तथा जळगाव जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राजेश वानखेडे यांनी नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे जाऊन समक्ष भेट घेऊन सदर प्रकरणी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.आणि निवेदन सादर केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे उपस्थित होते.

येथे ग्रामीण रुग्णालयाजवळ जुनी पोलिस वसाहत आहे.तर दुसरी वसाहत पोलिस ठाण्याच्या आवारातच आहे.परंतू सावदा ग्रामीण रुग्णालयाजवळील पोलिस वसाहतीची अतिशय दुरवस्था झाली आहे.परिणामी शासकीय निवासस्थाने उपलब्ध नसल्याने येथे नियुक्तीला असलेल्या आणि नवीन

आलेल्या पोलिस अधिकारी सह पोलिस कर्मचाऱ्यांची भाड्याने घर घेण्यासाठी शहरात पायपीट होत असते.पोलिसांना नाईलाजाने शहरात भाड्याने घरे घ्यावी लागतात.अगदी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कार्यकाळापासून येथे शासकीय पोलिस निवासस्थानांची मागणी आहे.परंतु अनेक वर्ष उलटूनही ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. या विषयासाठी सतत पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू ठेवला आहे.आताही या अनुषंगाने मुंबई येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आणि निवेदन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व वस्तुस्थिती समजून घेत याबाबत योग्य तो निर्णय जलदगतीने घेण्यात येईल.असे ठोस आश्वासन दिले आहे.असे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी सांगितले.

No comments