मोठा वाघोदा येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी रावेर (संपाद...
मोठा वाघोदा येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी रावेर
(संपादक: हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील मोठा वाघोदा ता. रावेर येथील मोठा मठ श्रीकृष्ण ज्ञान मंदिर येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त श्री मूर्तीस मंगलस्नान, पूजा अवसर ,विडा अवसर ,प्रसाद वंदन, तसेच येथील शासकीय कार्यालय शाळा यांना भगवान श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त प्रतिमा देण्यात आले येथील प्रकाश विद्यालय व जुनियर कॉलेजमध्ये आचार्य वाघोदेकर् बाबा शास्त्री यांच्या हस्ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या प्रतिमा भेट देण्यात आली प्रतिमा पूजन करून सभा आयोजित करण्यात आली सभेचे अध्यक्ष आचार्य वाघोदेकर बाबा शास्त्री होते या प्रसंगी चेअरमन डि.के महाजन, सचिव किशोर पाटील, अध्यक्ष पि. टी महाजन ,श्रावण महाजन, पी. एल. महाजन,मुख्याध्यापक व्ही. एस .महाजन परवेक्षक राजेश बडगुजर, ईश्वर महाजन विजयकुमार पाटील, पी. व्ही .चौधरी ,राहुल पाटील, वसंत सुपे, डाॅ.गुरुदत पाटील, यासह सर्व शिक्षक म्हणून उपस्थित होते. तसेच ग्रा. प. कार्यालय येथे सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांची महंत वाघोदेकर बाबा शास्त्री यांच्या हस्ते देण्यात आली येथील गोपाल कृष्ण वाचनालय मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन पी .टी .महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सुधाकर चौधरी श्रावण महाजन विजयकुमार पाटील सिताराम महाजन जीवन कापसे व कर्मचारी उपस्थित होते.तसेच आज शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकाचा सत्कार आचार्य वाघोदेकर बाबा शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला.

No comments