adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई तब्बल १५ लाखांच्या २९ चोरी केलेल्या मोटरसायकल हस्तगत दोघे जेरबंद

  कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई तब्बल १५ लाखांच्या २९ चोरी केलेल्या मोटरसायकल हस्तगत दोघे जेरबंद अहमदनगर :- सचिन मोकळ (संपादक:हेमकांत गायकव...

 कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई तब्बल १५ लाखांच्या २९ चोरी केलेल्या मोटरसायकल हस्तगत दोघे जेरबंद


अहमदनगर :- सचिन मोकळ

(संपादक:हेमकांत गायकवाड)

लग्न,अंत्यविधी,दशक्रियाविधी, हॉस्पिटल पार्किंग ठिकाणच्या मोटार सायकली चोरी करणा-या आरोपींची टोळी कोतवाली पोलीसांच्या जाळ्यात एकूण चोरीच्या २९ मोटारसायकली ताब्यात तर १५ लाख रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कोतवाली पोलीसांना मोठे यश आले आहे.नगर शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांची मोठया प्रमाणात वाढ झाल्याने शहरातील मोटार सायकली नक्की कोण चोरी करत आहे,व त्या गाड्या जातात तरी कुठे या बाबत माहिती काढणे करिता कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शना प्रमाणे एक पथक तयार केले व त्यानुसार तांत्रिक विश्लेषन करुन माहिती काढली असता आरोपी नामे किशोर जयसिंग पटारे (रा.पिंपळगाव माळवी ता.नगर) हा नगर शहर व जिल्हा तसेच पुणे बीड परिसरातील मोटार सायकली लग्न, अंत्यविधी, दशक्रियाविधी अश्या विविध ठिकाणावरुन मोटार सायकली चोरी करुन त्याची विल्हेवाट लावणे करीता त्याचे साथिदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे रा. लाख पढेगाव ता.राहुरी अ. नगर,अरुण सुधाकर जाधव रा.टाकळी मिया ता राहुरी अ.नगर यांच्या मदतीने ओळखीच्या लोकांना गाडीचे पेपर आणुन देतो व तो पर्यंत तुम्ही गाडी वापरा त्या बदल्यात मला आत्ता २-३ हजार रुपये द्या व नंतर गाडी तुमच्या नावावर केल्या नंतर तीचे उर्वरीत पैसे द्या असे सांगुन जवळपासच्या लोकांना चोरीच्या दुचाकी गाड्या वापरण्यास देत असल्याची माहीती मिळाली त्या प्रमाणे सदर पथकाने शोध मोहिम हाती घेतली असता सदर आरोपी किशोर जयसिंग पटारे हा फरार झाला व त्याचे साथीदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे,अरुण सुधाकर जाधव यांना कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहीती मिळताच यातील मुख्य आरोपी किशोर पटारे याने चोरी केलेल्या व त्याचे ओळखीच्या लोकांना वापरायला दिलेल्या गाड्या परत घेवुन त्या त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी बेवारस सोडलेल्या आहेत अशी माहीती ताब्यात घेतलेल्या दोन आरोपीकडुन प्राप्त झाली.त्यानुसार त्यांनी दाखवलेल्या ठिकाणावरुन एकुण १५ लाख रुपये किंमतीच्या २९ मोटार सायकली विविध ठिकाणा वरुन हस्तगत करण्यात आल्या आहेत.सदर जप्त केलेल्या मोटार सायकली या आरोपींनी बीड,पुणे,अ.नगर जिल्ह्यातून चोरी केलेल्या आहेत.कोतवाली पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी नागरीकांना आव्हान केले आहे कि, आपल्या चोरीस गेलेल्या गाड्यांचे चेसी व इंजीन क्रं खात्री करावी.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर श्री अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,पोसई/महेश शिंदे, पोसई/प्रविण पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोहेकाँ/योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी,गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके,सलीम शेख,अविनाश वाकचौरे,अभय कदम, अमोल गाढे,सतिश शिंदे, अतुल काजळे,राम हंडाळ,वर्षा पंडीत,सफौ/ अशोक सरोदे,लक्ष्मण बोडखे,अनुप झाडबुके, मपोकाँ/पल्लवी रोहकले,पुजा दिक्कत, दक्षिण मोबाईल सेलचे पोकाँ/राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

No comments