जे.ई. स्कूलच्या मुख्याध्यापक पदी नितीन भोंबे मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक:-हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका ...
जे.ई. स्कूलच्या मुख्याध्यापक पदी नितीन भोंबे
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक:-हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, जे ई स्कूल या विद्याशाखेत नितीन भोंबे यांची मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आली आहे. नितीन भोंबे दि. १७ जून १९९६ पासून ते नवीन माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक पदाचा कार्यभार सांभाळत त्यांनी त्यांच्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर २००७ ते २०१९ एम एम नारखेडे विद्यालय इथं ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. याच विद्यालयात १.७.१९ पासून ते मुख्याध्यापक या पदावर त्यांची नेमणूक झाल्यानंतर याठिकाणी त्यांनी 30 ऑगस्ट २०२४ पर्यंत उत्तम सेवा बजावली. प्रशासकीय कामकाजाबाबत त्यांना कुशल ज्ञान आहे . म्हणून मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन + सोसायटीने त्यांची जे ई स्कूल सारख्या मोठ्या शैक्षणिक विद्यापिठात मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.. त्यांच्या या नियुक्ती बाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. + संस्थेचे मार्गदर्शक आ. एकनाथराव खडसे,चेअरमन रोहिणीताई खडसे, सचिव डॉ. सी. एस चौधरी,उपाध्यक्ष नारायण चौधरी व सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments