श्री गणेश सार्वजनिक वाचनालयामध्ये सत्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक :- हेमकांत गायकवाड...
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयामध्ये सत्कार
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील श्री गणेश सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वाचनालयाचे संचालक नितीन नारायण चौधरी यांची सातपुडा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्हाचेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, वाचनालयाचे संचालक प्रशांत भोजराज बोरोले यांचा वाढदिवसानिमित्त, तुषार भोजराज बोरोले यांची न्हावी दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल, धीरज सुधाकर चौधरी यांची दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल, शारदा माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक प्रवीण मधुकर वारके यांना उज्जैनकर फाउंडेशन चा तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित कुमार निळकंठ फिरके यांना उज्जैनकर फाउंडेशनचा पत्रकारितेतील तापी पूर्णा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वांचा वाचनालयाकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी वाचनालयाचे चेअरमन हेमकांत गाजरे,व्हाचेअरमन शरद चोपडे, सचिव युवराज तळले, संचालक गंगाराम वाघुळदे ,प्रवीण वारके, चेतन इंगळे, ग्रंथपाल ललित इंगळे, भास्कर भोगे यांच्या सह वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हेमकांत गाजरे यांनी, सूत्रसंचालन युवराज तळेले यांनी तर आभार शरद चोपडे यांनी मानले.

No comments