स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे सायबर सुरक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर मुक्ताईनगर प्रतिनिध...
स्व.निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मुक्ताईनगर येथे सायबर सुरक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिर
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
सायबर सुरक्षा हा कार्यक्रम क्विक हिल फाउंडेशन व महाराष्ट्र सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत स्वयंसेवक म्हणून निवड झालेल्या प्रगती कोल्हे व सायली चौधरी या विद्यार्थिनींच्या अनमोल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तथा शिक्षकांकरिता सायबर सुरक्षा जनजागृती माध्यमातून घेण्यात आला.
दिवसेंदिवस सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे याला डिजिटल जगतातील डिजिटल टेक्नॉलॉजी चा उत्तरोत्तर
वाढत चाललेला दुरुपयोग ही बाब कारणीभूत ठरत आहे असे म्हणता येईल. आजच्या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या जगतात चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर हा जणू अनिवार्य झालेला आहे; यातच मोबाईल सारख्या आधुनिक संपर्क माध्यमाचा दुरुपयोग कळत नकळत कधी आपल्या हातून होऊ नये तथा इंटरनेट, फेसबुक, व्हाट्सअप,इंस्टाग्राम असे अनेक प्रकारचे ॲप्स डाऊनलोड करण्यात व त्याचा आनंद लुटण्यात लवकरात लवकर प्रसिद्धी मिळवता यावी यासाठी लहान थोरांपासून मोठ्या प्रमाणावर या गोष्टींकडे लक्ष देण्यात येत आहे तर लहान चिमुकले विद्यार्थी विविध कार्टून आणि गेम खेळण्यात मोबाईल मध्ये मग्न आहेत हे सर्व माध्यम वापरतांना सर्वांनी विशेष काळजी घ्यावी व सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे या प्रकारची जनजागृती या कार्यक्रमांतर्गत करण्यात आली तर या कार्यक्रमात प्रारंभी मार्गदर्शकांचे सहर्ष स्वागत शाळेचे मुख्याध्यापक व्ही.के.वडस्कर यांच्याकडून करण्यात आले व कार्यक्रमा शेवटी मोबाईल या आधुनिक माध्यमाचा उपयोग विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जित व महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्याकरिता करावा तथा पालकांनी सुद्धा मोबाईलच्या वापरा संदर्भात आपल्या मुला, मुलींकडे विशेष लक्ष द्यावे व वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शक बनावे असे मार्गदर्शन मुख्याध्यापकांकडून करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका राजश्री फेगडे मॅडम तर आभार प्रदर्शन सहशिक्षक सरदार तायडे सर यांच्याकडून करण्यात आले.

No comments