अडावद येथील त्या मारेकरींना १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी प्रतिनिधी चोपडा (संपादक:-हेमकांत गायकवाड) दि.३/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा.चे सुम...
अडावद येथील त्या मारेकरींना १० तारखेपर्यंत पोलिस कोठडी
प्रतिनिधी चोपडा
(संपादक:-हेमकांत गायकवाड)
दि.३/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा.चे सुमारास अडावद गावाचे सरपंच बबन तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशन येथे फोन करुन माहिती दिली की, अडावद गावालगत असलेल्या हजरत पिरपाकरशा बाबाच्या दर्गा समोर एक इसम मयत स्थितित पडलेला आहे. अशी माहिती दिली असता अडावद पोलीसांनी तेथे जावून खात्री केली असता सदर ठिकाणी अंदाजे ४५ वर्ष वयाचा इसम मयत स्थितिल पडलेला होता. तेव्हा पोलीसांनी आजू बाजूच्या लोकांना विचापुस केली असता सदर मयत इसम हा जगदिश फिरंग्या सोलंकी वय ४५ रा. पाटचारी अडावद ता. चोपडा जि. जळगाव असे असल्याची माहिती मिळाली पंचांसमक्ष पोलीसांनी इन्क्वेस्ट पंचनामा केला असता मयताच्या अंगावर ठिक ठिकाणी मारहाण झाल्याच्या व्रण दिसत होते. तसेच मयताच्या डोक्यावर, कपाळावर तसेच कानावर गंभीर जखमा दिसत होत्या तसेच कशाचे तरी सहाय्याने गळा आवळल्याचे व्रण दिसत होते.
तरी सदर बाबत मयताचा मुलगा ईश्वर जगदिश सोलंकी वय २० रा.पाटचारी अडावद ता.चोपडा याचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी याचे विरुध्द अडावद पो.स्टे. गुन्हा रजि.नं. १५१७/२०२४ मा.न्या.सं. कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासाचे अनुशंगाने मा. पोलीस अधिक्षक सो. महेश्वर रेड्डी सो, मा.अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव श्रीमती कविता नेरकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा भाग डॉ. कुणाल सोनवणे सो, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड सी. यांनी भेट दिली तसेच सदर गुन्हयांच्या तपासाबाबत सुचना देवुन अज्ञात आरोपी यांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत मार्गदर्शन केले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ व अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि वाघमारे व पोलीस पथक आरोपीचा शोध घेत असतांना अडावद पोलीसांना गोपनिय बातमीदार यांचे कडून माहिती मिळाली की, पाटचारी जवळील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थान समोर पाटावर बसून गांजा पिणारे १) इरफान अब्दुल तडवी, २) शहारुख इस्माईल तडवी, ३) शेख मोईन शेख मजिद, ३) कलिंदर रशिद तडवी यांनी सदर मयतास ठार मारल्याची माहिती मिळाल्याने त्यांना संशयीत यांना ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी गांज्याच्या नशेत मयत यास शिविगाळ केली असता मयत हा त्यांना म्हणाला की, तुम्ही गांजा पिणारे गंजोटी येथे का बसले आहेत असे बोलल्याचा आरोपीना राग आल्याने त्यांनी मयत याच्या मोटार सायकलला लाथ मारुन खाली पाडले तेव्हा मयत हा पळू लागल्याने त्यास कब्रस्थान मधिल बांधकाम केलेल्या व्हरांडयात व रुममध्ये घेवुन गेले व तेथे लाठ्या काठयाने मारहाण केली तसेच आरोपी कलिंदर रशिद तडवी याने दोरीने गळा आवळून ठार मारले तसेच प्रेत उचलून हजरत पिरपाकरशा बाबाच्या दरग्या समोर आणून टाकले आहे अशी माहिती दिली असल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला असुन आरोपी यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची दि.१०/०९/२०२४ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिली असून सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रमोद वाघ व अडावद पोलीस करित आहेत.

No comments