होमगार्डकडून पोलिसाला अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण अहमदनगर (सचिन मोकळ) संपादक हेमकांत गायकवाड अहमदनगर :- छत्रपती संभाजी ...
होमगार्डकडून पोलिसाला अश्लील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण
अहमदनगर (सचिन मोकळ)
संपादक हेमकांत गायकवाड
अहमदनगर :- छत्रपती संभाजी नगर रोडवरील शेंडी बायपास येथे होमगार्डने पोलिसाला पोलीसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.नगर शहराजवळील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपास चौकात वरिष्ठांच्या आदेशाने वाहतूक नियमन करत असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास एका होमगार्डने अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.तसेच पुन्हा या चौकात तसेच या रोडला 'ड्युटीला आला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही', अशी धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी होमगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी होमगार्ड बाळू जाधव याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३२, १२१, १२६ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२),३५१ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे

No comments