महिलांप्रती आदर आणि सन्मान निकोप समाजासाठी अतिआवश्यक - अन्नपूर्णा सिंग यावल / फैजपूर (प्रतिनिधी ) (संपादक:-हेमकांत गायकवाड) भारतात संविधा...
महिलांप्रती आदर आणि सन्मान निकोप समाजासाठी अतिआवश्यक - अन्नपूर्णा सिंग
यावल / फैजपूर (प्रतिनिधी )
(संपादक:-हेमकांत गायकवाड)
भारतात संविधानानुसार कायद्यांची कडक अंमलबजावणी असूनही महिला अत्याचार, सायबर क्राईम, विनयभंग व बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी याविषयी सजग, सतर्क राहून स्वतःचे संरक्षण करावे व सोबतच समाजातील वातावरण पोषक, सकारात्मक व आनंददायी राहण्यासाठी सहयोग द्यावा असे आवाहन श्रीमती अन्नपूर्णासिंग (आयपीएस ) उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर यांनी व्यक्त केले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा डॉ कल्पना पाटील, पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर मोताळे, उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य प्रा डॉ हरीश नेमाडे, प्रा डॉ जयश्री पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्ता येथील महिला डॉक्टर वरील अत्याचार, बदलापूर प्रकरण यासंबंधी सजगता निर्माण व्हावी व महाविद्यालयातील वातावरण अध्ययन अध्यापनासाठी पोषक व्हावे या हेतूने कायद्याच्या चौकटीत राहून जीवनाला यशस्वी आणि आनंदी करण्याच्या उदात्त हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ जयश्री पाटील यांनी केले. त्यात महिला सबलीकरण, महिला सशक्तिकरण यासाठी समितीमार्फत आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती करून देण्यात आली. अध्यक्षीय समारोपात प्रा डॉ कल्पना पाटील यांनी श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांचे स्वागत व अभिनंदन करीत महाविद्यालयातील वातावरण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत पोषक असून यापुढेही करिअरला उज्वल संधी उपलब्ध करून देणे सोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेतली जाईल. व विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया शिरसाळे यांनी केले तर आभार श्रद्धा नाथजोगी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ सीमा बारी, डॉ सरला तडवी, डॉ पल्लवी भंगाळे, प्रा नाहीदा कुरेशी, प्रा जयश्री फिरके, प्रा धीरज खैरे, प्रा डॉ शरद बिऱ्हाडे, प्रा वसुंधरा नेहते, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, शेखर महाजन यांनी परिश्रम घेतले.


No comments