वार्ड क्रमांक ३ मधील मागासवर्गीयांना कायमचे घरकुल मंजूर करून द्या ... जगदीश मानवतकर ( बहुजन भारत पार्टी राज्य सचिव) प्रतिनिधी :- वाशीम (...
वार्ड क्रमांक ३ मधील मागासवर्गीयांना कायमचे घरकुल मंजूर करून द्या ...जगदीश मानवतकर ( बहुजन भारत पार्टी राज्य सचिव)
प्रतिनिधी :- वाशीम
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मौजे वाशीम येथील सिव्हिल लाईन , वार्ड क्रमांक ३ , झोपडी वसाहत मधील मागासवर्गीय लोकांना आपल्या घरापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे . वाशीम येथील वार्ड क्रमांक ३ मधील खुल्या जागेवर तीस वर्षापासून मागासवर्गीय लोकांनी अतिक्रमण केले आहे .
या वस्तीवर भूमी आणि बेघर लोक बऱ्याच वर्षापासून राहतात. परंतु या अतिक्रमण धारकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ,तेथे राहत असलेल्या जागेसमोर आरोग्य प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद च्या वतीने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी हे यांना त्या जागेतून कायमचे अतिक्रमण काढून घ्या आणि आम्हाला आरोग्य विभागाचे कार्यालय बांधण्यासाठी मोकळी करा अशा प्रकारची मागणी करीत आहेत परंतु येथील रहिवासी हे गेल्या हे गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करतात . त्यामुळे ते राहत असलेल्या जागेवर घरकुल मंजूर करून द्या , घरकुलाचे नियमानुकूल करा,
यांना पक्की घरी द्या अन्यथा ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि बहुजन भारत पार्टी तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा जगदीश मानवतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सविस्तर वृत्त , असे की , वाशिम मधील वार्ड क्रमांक तीन , झोपडपट्टी मधील मागासवर्गीय रहिवाशांना आपल्या जागेतून आपल्याला कायमचे काढून टाकण्यात येत आहे असा संशय येत असल्याने त्यांनी नगरपरिषद वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना भेट दिली.
या भेटीदरम्यान असे कळाले की, या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारत आहे . परंतु ही नवीन इमारत उभारताना या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी येथील रहिवासी यांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तिथे बांधकाम सुरू केले आहे . यामुळे यांना त्यांच्या घरापासून कायमचे वंचित राहण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून या रहिवासांनी अशी मागणी केली आहे की, आम्हाला उठवायचे असेल तर अगोदर आम्हाला घरकुल मंजूर करून द्या , आमच्या घराचा प्रश्न दूर करा तर आम्ही उठतो अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतो अशा प्रकारचे निवेदन यांनी जिल्हाधिकारी साहेब , नगरपरिषद चे मुख्याधिकारी साहेब, जिल्हा परिषद चे मुख्याधिकारी साहेब यांना पत्र द्वारे कळविले आहे. यावेळी जगदीश मानवतकर संस्थापक अध्यक्ष ऑल इंडिया न्यू टायगर सेना आणि बहुजन भारत पार्टी राज्यसचिव जगदिश मानवतकर यांनी असे आश्वासन दिले आहे की ,ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि बहुजन भारत पार्टी आपल्या पाठीमागे उभी आहे .
आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देवू , आपल्याला न्याय नाही मिळाला तर ऑल इंडिया ब्लू टायगर सेना आणि बहुजन भारत पार्टी तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा जगदीश मानवतकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे . यावेळी बहुजन भारत पार्टीचे राज्यसचिव तथा ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर सर , बहुजन भारत पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ शेळके पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ पुंडसे , जिल्हा सोशल मीडिया प्रमुख बादल भाऊ वानखडे, ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे विदर्भ संपर्कप्रमुख संविधान भाऊ ढोले , वाशिम जिल्हा अध्यक्ष अक्षय भाऊ इंगोले , वाशिम जिल्हा उपाध्यक्ष विशाल भाऊ मुंडे , बहुजन भारत पार्टीचे वाशिम जिल्हा संघटक रवी भाऊ ठोके , बहुजन भारत पार्टीचे जिल्हा संघटक गौतम भाऊ कंकाळ , जिल्हा कार्याध्यक्ष गजानन कदम यांच्यासह या ठिकाणातील रहिवासी चंद्रभागाबाई काळे, मंगलाबाई ठाकरे , आम्रपाली इंगोले , सुनीता सदावर्ते, छायाबाई कांबळे, गोकर्णाबाई सरकटे , अनिता बाई पंडित , प्रीती भगत , अनिता पवार, काजल चव्हाण, सारिका राऊत, मंदा कुंभारकर , उज्वला उचित, शालिनी खडसे, अनिता नरनाळे , सुरेखा राठोड, रेणुकाबाई बांगर , सीमाबाई मावळे सुलोचनाबाई ताजने , गीताबाई जाधव, वंदनाबाई नरवाडे, स्वातीबाई साबळे, लक्ष्मीबाई फुंडसे, अर्चना बाई साबळे, छायाबाई कांबळे, भाग्यश्री मोरे , द्वारकाबाई धवसे, संगीता ठोके , रमाबाई खंदारे यांच्यासह सर्व रहिवासी यांची उपस्थिती होती.





No comments