adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणेश महोत्सवा निमित्त जिल्हाविधी सेवा प्राधिकरण तर्फे कायद्यावर पथनाट्य सादर ..............

  गणेश महोत्सवा  निमित्त जिल्हाविधी सेवा प्राधिकरण तर्फे कायद्यावर पथनाट्य सादर ..............     वाशीम प्रतिनिधी  (संपादक :- हेमकांत गायक...

 गणेश महोत्सवा  निमित्त जिल्हाविधी सेवा प्राधिकरण तर्फे कायद्यावर पथनाट्य सादर ..............    


वाशीम प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड )    

 महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण च्या आदेशान्वये वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने गणेश महोत्सवानिमित्त विविध गणेश मंडळासमोर पोक्सो कायद्याच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली.  या पथनाट्याचे सादरीकरण पाटील नगर येथील छत्रपती गणेश मंडळ येथे करण्यात आले आहे   . पोक्सो कायद्याची माहिती जनतेला होऊन त्याची योग्य ती अंमलबजावणी हवी या उद्देशाने सदर पथनाट्याची सादरीकरण करण्यात आले.  या पथनाट्याची सुरुवात ८ सप्टेंबर २०२४ पासून वाशिम येथील विविध गणेश उत्सव मंडळामध्ये विविध ठिकाणी करण्यात आली . त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी पाटील नगर येथील छत्रपती गणेश मंडळ येथे पोक्सोच्या संदर्भातले पथनाट्य सादर करण्यात आले . यावेळी मुख्य लोक अभी रक्षक ऍड. परमेश्वर शेळके यांचे मार्गदर्शन लाभले तर उपमुख्य लोक अभिरक्षक एडवोकेट राजेंद्र विसपुते यांनी हे पथनाट्य दिग्दर्शित केले आहे  . या पथनाट्यात विधी स्वयंसेवक जगदीश मानवतकर , प्रभू कांबळे, मोतीराम खडसे , राजकुमार पडघान , माधव डोंगरदिवे , शितल बनसोड , संध्या सभाधिंडे ,सुशील भिमजीयानी , स्नेहल इंगोले यांनी परिश्रम घेतले.

No comments