◼️ दुर्लक्ष- तब्बल २६ वर्षांपासून धरणाला पुर्ण होण्याची प्रतीक्षा! _येत्या ६० दिवसांत पाडळसरे धरण केंद्रामध्ये सामील न झाल्यास!!_ प्रतिनिधी...
◼️ दुर्लक्ष- तब्बल २६ वर्षांपासून धरणाला पुर्ण होण्याची प्रतीक्षा!
_येत्या ६० दिवसांत पाडळसरे धरण केंद्रामध्ये सामील न झाल्यास!!_
प्रतिनिधी चोपडा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे करणार धरणावर जल-सत्याग्रह / जलसमाधी आंदोलन!!
तापी पाटबंधारे विभाग महामंडळ अंतर्गत खानदेशातील सर्वात मोठा प्रकल्प तापी नदीवर पाडळसरे धरण १९९८ पासुन साकारण्यात येत आहे. अमळनेर सह
चोपडा,पारोळा,धरणगाव, शिंदखेडा व धुळे तालुक्यांना वरदान ठरणारे पाडळसरे धरण आहे. पाडळसरे धरणाला सुरूवातीला पूर्ण करण्यासाठी सुरूवातीला १४२.६४ कोटी गरज भासत होती. परंतु आतापर्यंत जेवढे ही सरकार आले . त्यांनी या धरणाला तूट पुंजी रक्कम दिल्यामुळे हे धरण पुर्ण झाले नाही. व ह्या धरणाची किंमत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ गेली. ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हे धरण राज्य सरकार पुर्ण करू शकत नाही. यामुळे हे धरण केंद्र सरकार मध्ये सामील झाले पाहिजे.
केंद्रीय प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत सामाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव दाखल झाला आहे. केंद्राने हे धरण येत्या ६० दिवसांत केंद्राच्या योजनेमध्ये सामील केले पाहिजे अशी विनंती उर्वेश साळुंखे यांनी केली आहे.
नाही! केल्यास बुधगाव ता. चोपडा येथील पाडळसरे धरण जन आंदोलन समीचा कार्यकर्ता धरणावर जल सत्याग्रह / जलसमाधी आंदोलन करणार आहे.उर्वेश साळुंखे-बुधगाव ता. चोपडा
_सदस्य - पाडळसरे धरण जन आंदोलन समीती_

No comments