उमरगाव गुजरात येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी विशेष प्रतिनिधी उमरगाव (गुजरात) (संपादक :- हेमकांत गायकवाड) उमरगाव...
उमरगाव गुजरात येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी
विशेष प्रतिनिधी उमरगाव (गुजरात)
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
उमरगाव गुजरात येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण पूजा अर्चना करून सत्यनारायणाची पूजा करून अभिवादन करण्यात आले.
व जिवाजी महाले यांचा प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. या ठिकाणी समाजाचे सर्वच बंधू भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते तसेच खानदेश समाज विकास ट्रस्ट चे प्रमुख पाहुणे ही उपस्थित होते. या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली होती
त्यात प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक तसेच भाग घेणाऱ्या सर्व महिलांना मुलींना समाजातर्फे सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण खास भेटवस्तू देण्यात आल्या तसेच संगीत खुर्ची चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
समाजाचे अध्यक्ष संजय चित्ते.उपअध्यक्ष गोकुळ चित्ते . खजिनदार चंपालाल वाघ . व जिवा सेनेचे उमरगाव तालुका अध्यक्ष प्रशांत बोरसे(हातेडकर) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात कार्याध्यक्ष म्हणून श्री अभिमन्यू जगताप. श्री राजेंद्र वरसाळे. श्री संदीप वाघ. यांनी पाहिले सामाजिक कार्यकर्ते श्री दिनेश चित्ते.श्री रूपसंघम चित्ते. विलास चित्ते. श्री रमेश सैंदाने.
श्री रमेश बोरसे श्री पोपटलाल चित्ते श्री भास्कर चित्ते. संतोष महाले . जितेंद्र बोरसे . ईश्वर चित्ते.सुनील वाघ.हर्षल बोरसे.नारायण सोनवणे.रवींद्र वाघ. सचिन वारूडे.रमेश सनेर. मुरली सैंदाने. पप्पू वाघ. सुदर्शन शिरसाठ राहुल सोनवणे निलेश वाघ.भानुदास अहिरे.
आदी सर्व समाज बांधव सहपरिवार उपस्थित राहून समाजात एकता दाखवत कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला. कार्यक्रमाची समाप्तीनंतर समाजातर्फे सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तर अशा स्वरूपात नियोजित कार्यक्रमाची सांगता झाली







No comments