adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा येथील सचिन महाले सरपंच सम्राट पुरस्काराने सन्मानित

  निंभोरा येथील सचिन महाले सरपंच सम्राट पुरस्काराने सन्मानित रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी  (संपादक: हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील निंभ...

 निंभोरा येथील सचिन महाले सरपंच सम्राट पुरस्काराने सन्मानित


रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी 

(संपादक: हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील निंभोरा बु:ता:रावेर येथील ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सचिन सुरेश महाले यांना  एन. बी. सोशल सामाजिक ग्रुप त्यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातून एकमेव कार्यतत्पर सरपंच सम्राट म्हणून सन्मानित करण्यात आले.

          राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे दि.५  रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी व रावेर यावल मतदार संघाचे आमदार श्री शिरीष दादा चौधरी, एन.बी. सोशल समूहाचे  संजय मलमे व ग्रुप प्रेसिडेंट ए. श्रीनिवास, व त्यांच्या टीमने केले.

    कर्तृत्व हेच खरे नेतृत्व या म्हणीप्रमाणे सरपंच सचिन महाले यांनी निंभोरा येथे १६ फेब्रुवारी २०२१ पासून ते आजतागायत गावाच्या अधिकाधिक सर्वांगीण विकासासाठी जी धडपड करत आहे या धडपडीची व विकास कामांची दखल घेत त्यांना जिल्हाभरातून एकमेव असा सरपंच सम्राट पुरस्कार सन्मानपत्र सन्मानचिन्ह देत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

        आपल्या कार्यकाळात  त्यांनी निंभोरा गावासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिलांना अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित केले.

No comments