शिक्षक दिवासालाच शिक्षकांनी केला निषेध;जुनी पेन्शन योजना व शाळेची वेळ बदलण्याची मागणी चोपडा (प्रतिनिधी) (संपादक:हेमकांत गायकवाड) शासनमान...
शिक्षक दिवासालाच शिक्षकांनी केला निषेध;जुनी पेन्शन योजना व शाळेची वेळ बदलण्याची मागणी
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक:हेमकांत गायकवाड)
शासनमान्य आदिवासी विकास विभाग अनुदानित कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड तथा राज्याध्यक्ष राजेश पाटील यांच्या समन्वयातून आदिवासी विकास विभाग कर्मचाऱ्यांवर करीत असलेल्या अन्यायाविरोधात ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून निषेध व्यक्त करण्यात आला. अन्यायकारक अशी शाळेची वेळ बदलण्यात यावी,कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी निषेध व्यक्त करताना सर्व कर्मचाऱ्यांनी काळया फीती लावून कामकाज केले.यावल प्रकल्पातील संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शासकीय तथा अनुदानित आश्रमशाळा यांनी निषेध व्यक्त केला होता. मागण्या मान्य न झाल्यास येत्या २३सप्टेंबर रोजी अपर आयुक्त कार्यालय नाशिक येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही मत जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे यांनी व्यक्त केले.शिक्षक आमदार निवडीवेळी जळगाव जिल्ह्याच्या प्रचारात आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेची वेळ बदलतो म्हणून आश्वासन दिले होते ते हवेतच विसरले.

No comments