Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दोन लाखांच्या अवैध गुटख्यासह दोन गुटखा तस्करांना मोटारसायकलसह अटक सावदा पोलीसांचा सापळा यशस्वी .

  दोन लाखांच्या अवैध गुटख्यासह दोन गुटखा तस्करांना मोटारसायकलसह अटक            सावदा पोलीसांचा सापळा यशस्वी  .   रावेर प्रतिनिधी मोहसीन मु...

 दोन लाखांच्या अवैध गुटख्यासह दोन गुटखा तस्करांना मोटारसायकलसह अटक            सावदा पोलीसांचा सापळा यशस्वी  .


 रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी सावदा

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

ता.रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 24/09/2024

महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे उत्पादन, विक्री, वितरण, व साठा तसेच वाहतुकीस  प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु पानमसाला व विमल गुटखा  कब्जात बाळगुन मोटारसायकलने  वाहतुक करतांना सावदा पोलीस स्टेशन चे पथकाने दोन जणांना अटक केली व आरोपींविरुध्द सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

     सविस्तर असे की  सावदा पोलीस स्टेशन हद्दीत आरोपी नामे 1) अनिल ओंकार पाटील, वय-40, रा.शिवाजीनगर जळगाव., 2) रोहीत मुकेश बरकले, वय-22, रा.शिवपुर, ता.भुसावळ हे सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा हा कब्जात बाळगुन पुरवठा विक्री करण्यासाठी मोटारसायकल वर घेऊन जात असल्याची गोपनिय बातमी सावदा पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.विशाल पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकास माहीत देत रवाना करुन संबंधितांवर पाळत ठेवून सापळा रचला  व  आरोपींना मुद्देमालासह  लुमखेडा ता.रावेर शिवारात सावदा ते हतनुर धरण रोडवर पाटाचे चारीजवळ पकडले या दोघां गुटखा तस्करांजवळील  2,00,560/-रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु व विमल गुटखा मोटार सायकलीसह ताब्यात घेतले व त्यांचे विरुध्द विरुध्द सावदा पोलीस स्टेशन गुरन-194/2024,भारतीय न्याय संहीता सन 2023 चे  कलम-123, 274, 275, 3(5), 223 प्रमाणे गुन्हा दि.24/09/2024 रोजी  गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी हि सहा.पोलीस निरीक्षक श्री.विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक राहुल सानप,पोहेकाँ.संजीव चौधरी,पोकाँ.सुनिल. कुरकुरे पो कॉ बबन तडवी यांनी केली

No comments