महेन्द्र गोरख वाडे आंबेडकर नगर चोपडा यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग चोपडा शहर अध्यक्ष या पदावर नियु...
महेन्द्र गोरख वाडे आंबेडकर नगर चोपडा यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग चोपडा शहर अध्यक्ष या पदावर नियुक्ती
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
महेन्द्र गोरख वाडे आंबेडकर नगर चोपडा यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग चोपडा शहर अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली असून अशा आशयाचे पत्र त्यांना पक्षातर्फे प्राप्त झाले असून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग चोपडा शहर अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. पक्षाची संघटनात्मके बांधणी उत्तमरित्या करुन पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्व दूर पोहचविण्याठी आपण प्रयत्नशील राहाल.तसेच आपण आपल्या केलेल्या नियुक्तीचा कुठेही गैरवापर करणार नाही. व आपल्या कोणत्याही कृतीने पक्षाच्या प्रतिष्ठेस हानी पोहचणार नाही. याची दक्षता घ्यावी. तरी आपण पक्षाच्या विचारांचा प्रसार व प्रचार जोमाने कराल हि ईच्छा व्यक्त करतो. व आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
No comments