adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हतनूर धरणाचे २०दरवाजे उघडले तापी नदीच्या काठालगतच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा

  हतनूर धरणाचे २०दरवाजे उघडले तापी नदीच्या काठालगतच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा मोहसीन मुबारक तडवी रावेर प्रतिनिधी (संपादक :-ह...

 हतनूर धरणाचे २०दरवाजे उघडले तापी नदीच्या काठालगतच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा


मोहसीन मुबारक तडवी रावेर प्रतिनिधी

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

हतनूर धरणाचे २०दरवाजे उघडले तापी नदीच्या काठालगतच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा. रावेर प्रतिनिधि मुबारक तडवी जळगाव जिल्ह्यातील रावेर -मुक्ताईनगर मध्यभागी असलेले  हतनूर धरण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील  सातपुडा पर्वताच्या रांगेत झालेल्या जोरदार पावसामुळे या पावसाळ्यात दुसर्यादा धरण भरले मोठ्या व प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.  हतनूर धरणातील परिसरात ३८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जळगांव जिल्हा प्रशासनाने 

तापीनदीच्या काठावरील व लगतच्या परिसरातील व गावातील 

नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी पर्यटकांनी नदीपात्र परिसरात न जाण्याचा तसेच गुरेढोरे नदीपात्रात घेऊन न जाणे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 0257-2217193 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे  हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे व  हतनूर धरणाचे २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून यातून ९९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

No comments