चोपडा तालुका येथे रिपाइं आठवले पक्षाचा संवाद मेळावा संपन्न.. चोपडा तालुक्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची कार्यकारणीची न...
चोपडा तालुका येथे रिपाइं आठवले पक्षाचा संवाद मेळावा संपन्न..
चोपडा तालुक्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची कार्यकारणीची निवड करण्यात आली
चोपडा प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची संवाद मेळावा चोपडा तालुका येथे दिनांक ३१/०८/२०२४ रोजी दुपारी १२ वाजता येथे मेळावाचे आयोजन चोपडा तालुका अध्यक्ष प्रभाकर (बापू) शिंदे व चोपडा शहर अध्यक्ष रविद्र वाघ यांनी केले होते
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेशजी मकासरे,खान्देश विभाग अध्यक्ष लक्ष्मण जाधव,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदाम सोनवणे,जळगांव जिल्हाअध्यक्ष भगवान सोनवणे,युवक जळगांव जिल्हाअध्यक्ष मिलिंद सोनवणे,भुसावळ तालुका अध्यक्ष सुनिल ढिवरे,यांची प्रमुख उपस्थिती होती व तसेच संवाद मेळावाचे अध्यक्ष रमेशजी मकासरे आरपीआय महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतीबा फुले,विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठकीत चोपडा तालुक्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची कार्यकारणी निवड करण्यात आली व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका पदाधिकारी यांच्या सह कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करीत आगामी काळातील होऊ घातलेल्या निवडणूक व पक्षाचे ध्येय धोरणे आणि पक्षाचा प्रचार व प्रसार करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खुल्या पत्रावर आधारित स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष घराघरात पोहचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे व अन्याय अत्याचार ला वाचा फोडून तळागळातील गोर गरीब शेतमजूर कष्टकरी बाधितांना न्याय मिळवून द्यावा.व मिळालेले निवडणूक चिन्ह उसधारक शेतकरी हे प्रत्येक घरात पोहचविण्याचे काम कराव.असे विचार मांडले.या प्रसंगी चोपडा तालुका अध्यक्ष बापू शिंदे,शहर अध्यक्ष रविंद्र वाघ,अनिल गुलाबराव शिरसाठ यांची तालुका उपाध्यक्ष व भागवत मोरे तालुका संघटक सुभाष पान पाटील (शाखाध्यक्ष गोरगावले खुर्द) महेश पाटील( आय टी सेल तालुका प्रमुख) म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच अनेक कार्यकर्तेचा पक्षांमध्ये प्रवेश करण्यात आले यावेळी भिका आनंदा फुगारे(चोपडा शहर उपाध्यक्ष)सुभाष ताराचंद पानपाटील,रामचंद्र संभाजी पाटील,रोशन भिका फुगारे,भीमराव बारकू भालेराव,पुरुषोत्तम नारायण शेटे,कन्हैया रूपचंद सोनवणे,अरुण भीमराव शिंदे,रवींद्र सोमा शिंदे,हर्षल सुनील साळुंखे,युवराज सरदार,विघन भालेराव,रवींद्र केशव बाविस्कर,विशाल संदानशिव (तालुका सचिव)शरद शिंदे असे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी व महिला कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रविण शिंदे यांनी केले.सर्वांचे आभार बापू शिंदे यांनी मानले.


No comments