adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी;शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे जोरात सुरू आ.संग्राम जगताप

  तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त...

 तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी

शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे जोरात सुरू आ.संग्राम जगताप


अहमदनगर (सचिन मोकळ)

(संपादक  :-हेमकांत गायकवाड)

महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची कामे सुरू आहे.राज्य सरकारच्या अंतर्गत असलेला तारकपूर रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा केला त्या माध्यमातून सुमारे १८ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून यामध्ये साईड गटार, पावसाच्या पाण्याची गटार,फुटपाथ स्ट्रीट लाईट,आणि सुमारे तीन किलोमीटर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागणार असून प्रगतीपथावर सुरू आहे. शहरामध्ये फिरत असताना नागरिक आता विकास कामांची चर्चा करू लागली असून पहिल्यांदाच एवढा मोठा निधी तुमच्या माध्यमातून शहर विकासाला मिळाला आहे.


नगरकर विकास कामांचे स्वागत करताना दिसत असल्यामुळे केलेल्या कामाचे समाधान मिळत आहे.नियोजनबद्ध कायमस्वरूपी ची दर्जेदार विकास कामे मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.तारकपूर रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी केली यावेळी भरत पवार अधिकारी वर्ग व ठेकेदार उपस्थित होते.तारकपूर रस्ता हा छत्रपती संभाजीनगर व मनमाड महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. या परिसरामध्ये तारकपूर एसटी स्टँड. शासकीय जिल्हा रुग्णालय. विविध खाजगी हॉस्पिटल एस पी कार्यालय. जिल्हा न्यायालय असून जिल्हाभरातून विविध नागरिक या ठिकाणी येत असून शहराच्या नाव लौकिकात भर पडणार आहे. तसेच या परिसरात विविध कॉलण्यानां      जोडणारा प्रमुख रस्ता असून यावरती मोठ्या प्रमाणात दळणवळण होत आहे. नागरिकांना अधिक-अधिकच्या चांगल्यासुविधा देण्याचे काम सुरू आहे. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

No comments