आदिवासी विद्यार्थ्यांना गावातच मिळणार दाखले- प्रांताधिकारी बबनराव काकडे यावल प्रकल्प, तहसील प्रांत कार्यालयाचा संयुक्त उपक्रम रावेर...
आदिवासी विद्यार्थ्यांना गावातच मिळणार दाखले- प्रांताधिकारी बबनराव काकडे यावल प्रकल्प, तहसील प्रांत कार्यालयाचा संयुक्त उपक्रम
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी.
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व आदिवासी गावांतील आदिवासी बांधव यांना गावातच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करवून शासन आपल्या दारी योजनेंतर्गत गावातच विविध दाखले वाटप करण्यात येणार असल्याचे फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बबनराव काकडे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, व रावेर यावल चे तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे
रावेर व यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना शिबीराद्वारे विविध दाखले मिळणार
आदिवासींच्या मिनी मंत्रालय असलेल्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास यावल, उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी कार्यालय अधिनस्त यावल व रावेर तहसील कार्यालय संयुक्त शिबीराद्वारे यावल तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बहुल गावांत शिबिरे घेत आदिवासी बांधवांना विविध प्रमाणपत्र व दाखले वाटप करण्याचा उपक्रम १८ सप्टेंबर बुधवार ते शुक्रवारपर्यंत राबविण्यात येणार आहे. या शिबिरात आदिवासी बांधव तसेच विद्यार्थी पालक यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तद्नंतर तपासणी करण्यात येवून दाखले व प्रमाणपत्र वाटप केले जाणार असल्याचे फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बबनराव काकडे यांनी सांगितले.
नागरिकांना तसेच विद्यार्थी पालकांना दाखले मिळण्यासाठी कार्यालयात फेर्यात जास्तीचा वेळ व पैसा खर्ची करावा लागतो, व यादरम्यान कागदपत्रे कमी अथवा काही त्रुटी असल्यास दाखले मिळत नाहीत या त्रासातून दिलासा मिळावा व या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपुर उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बबनराव काकडे प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी अरुण पवार तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडून आदिवासी बहुल भागातील आश्रमशाळांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या माध्यमातून मुख्याध्यापक, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या वतीने आदिवासी बांधवांकडून आवश्यक कागदपत्रे एकत्रित मागवले जातील. शिबिरातून अर्ज प्राप्त करुन घेत दाखले तयार झाल्यावर त्या-त्या गावात पुन्हा विशेष शिबीर घेत ते दाखले घरपोच वाटप करण्यात येणार आहे. अशी होणार तालुक्यात शिबिरे •१८ सप्टेंबर रोजी - शासकीय आश्रमशाळा मालोद, शासकीय आश्रमशाळा वाचझिरा, उज्ज्वल शिक्षण संस्थेची शाळा मनवेल.• १९ सप्टेंबर रोजी - शासकीय आश्रमशाळा डोंगरकठोरा, श्री संत ज्ञानेश्वरशिक्षण मंडळाची आश्रमशाळा मोहराळे. • २० सप्टेंबर रोजी - सातपुडा विकास मंडळ पाल संचलित गाडऱ्या जामन्या आश्रमशाळांचा समावेश आहे शिबीराठीचे अर्ज मुख्याध्यापक गजानन कटारे, किशोर महाजन, संजय आलोने, शिवहरी वानखेडे, साईदास पवार व हेमलता सावकारे यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते , सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन जगताप यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments