adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बहुजन भारत पार्टीच्या वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ शेळके यांची नियुक्ती.

  बहुजन भारत पार्टीच्या वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी  सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ शेळके यांची नियुक्ती.   वाशीम प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड...

 बहुजन भारत पार्टीच्या वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी  सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ शेळके यांची नियुक्ती.  


वाशीम प्रतिनिधी

संपादक हेमकांत गायकवाड 

   बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कसबे साहेब , राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव तथा विदर्भ प्रभारी विधानसभा जगदीश मानवतकर यांनी अरुण भाऊ शेळके यांचे वाशिम जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे .


सविस्तर वृत्त असे की बहुजन भारत पार्टी जे की वंचित , शोषित,  दलित,  आदिवासी , अल्पसंख्यांक यांच्यासह सर्व  बहुजनांच्या न्याय , हक्कासाठी संपूर्ण भारतभर कार्य करीत असते. बहुजन भारत पार्टी बहुजनांच्या हक्क,  न्याय,  अधिकार तसेच स्वाभिमान मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतभर कार्य करीत आहे.  त्यामुळे बहुजन भारत पार्टीच्या कार्याने प्रभावित होऊन अरुण भाऊ शेळके यांनी बहुजन भारत पार्टीत पक्षप्रवेश केला. 

त्यानंतर बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव जगदीश मानवतकर यांनी अरुण भाऊ शेळके जे की गेल्या दहा ते बारा वर्षापासून शेतकरी संघटना तसेच आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत.  त्यांचे हेच कार्य बघून बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव जगदीश मानवतकर यांनी त्यांच्यातला सुप्त गुण ओळखला आणि बहुजन भारत पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  त्यासोबत वाशिम जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी सुद्धा घोषित करण्यात आली. पदनियुक्तीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह वाशिम येथे पार पडला.

या जिल्हा कार्यकारिणींमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून अरुण भाऊ शेळके,  जिल्हा उपाध्यक्ष संजय भाऊ पुंडगे,  जिल्हा महासचिव रामदास कालापाड, जिल्हा महासचिव विशाल मुंडे , जिल्हा कार्याध्यक्ष रविभाऊ ठोके ,  जिल्हा सचिव अक्षय भाऊ इंगोले,  जिल्हा उपसचिव राजूभाऊ बांगर , जिल्हा उपसचिव अरुण भाऊ लांडगे, जिल्हा सोशल मीडिया  प्रमुख बादल वानखेडे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गजानन भाऊ कदम , जिल्हा उपसंघटक मनोज भाऊ पुंडगे , जिल्हा सचिव गजेंद्र भाऊ राऊत,  जिल्हा उपसचिव बबनराव वाळके यांच्यासह बऱ्याच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या . बहुजन भारत पार्टी येणाऱ्या वाशिम जिल्ह्या सह संपूर्ण विदर्भात विधानसभा , नगरपंचायत ,जिल्हा परिषद,  ग्रामपंचायत यांच्यासह सर्व निवडणुका ताकतीने लढेल तरी  बहुजन भारत पार्टीच्या महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असा आदेश  जगदीश मानवतकर यांनी यावेळी दिला. बहुजन भारत पार्टीचे अध्यक्ष वेंकटेश कसबे साहेब , राष्ट्रीय कोषाध्यक्ष बालाजी गजले साहेब हे येणाऱ्या 22 सप्टेंबर 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे बहुजन एल्गार मेळाव्यात येणार आहेत.  तरी वाशिम सह संपूर्ण विदर्भातील सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जगदीश मानवतकर यांनी केले आहे . तरी या बैठकीला अरुण भाऊ शेळके,  संविधान भाऊ ढोले ,अक्षय भाऊ इंगोले , विशाल मुंडे ,रामदास कालापाड, रविभाऊ ठोके , गौतम भाऊ कंकाळ,  मनोज भाऊ पुंडगे , संजय भाऊ पुंडगे , राजूभाऊ बांगर, अरुण भाऊ लांडगे,  गजानन भाऊ कदम , बादल वानखडे, गजेंद्र राऊत , बबनराव वाळके यांच्यासह बहुजन भारत पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
.

No comments