_अडावद येथे वन विभागाची धडक कारवाई ५० हजारांचे सागवान लाकूड एक खराद मशीन जप्त तर दोघांना केले अटक _बिडगाव प्रतिनिधी खलील तडवी (संपादक हेमक...
_अडावद येथे वन विभागाची धडक कारवाई ५० हजारांचे सागवान लाकूड एक खराद मशीन जप्त तर दोघांना केले अटक
_बिडगाव प्रतिनिधी खलील तडवी
(संपादक हेमकांत गायकवाड)
उनपदेव अडावद रस्त्यावर अनघड सागवान लाकडाच्या बेलनची मोटर सायकल वर अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अडावद वन विभागाला मिळाली होती त्या अनुषंगाने अडावद क्षेत्रातील वन क्षेत्रपाल(rfo) प्रशांत साबळे यांनी आपल्या पथकाच्या मदतीने दोन जणांना मुद्देमालासह अटक केली व त्या दोघांना न्यायालयात हजर केले त्यांना एक दिवसाची वन कोठडी मिळाली सागवान लाकडाची तस्करी करणारे हे दोघं रूपा पावरा महेश पावरा अडावद मध्ये कुणाला पुरवितात त्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढली त्या अनुषंगाने आज दिनांक १४/९/२०२४ रोजी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास रईस शेख इसा मन्यार यांच्या घरावर छापा टाकून १ खराद मशीन व सागवान लाकूड जप्त केले रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या कारवाईत अडावद वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे वनपाल योगेश साळुंखे एस पी नागणे भावना चव्हाण आर् एस निकुंबे एन जी सपकाळे प्रमिला मराठे सुमित्रा पवारा प्रकाश सपकाळे वनमजूर दशरथ पाटील संजू माळी राजू पाटील खलील तडवी रमजान तडवी अजीम तडवी फकृद्दीन तडवी भरत आढळके मनोहर पाटील व एस आर पी एफ पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेश होता

No comments