adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवणे, सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याची मागणी

खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवणे, सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याची मागणी   सामाजिक तथा माहि...

खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवणे, सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याची मागणी

 सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांची प्रशासनाकडे मागणी .


चोपडा प्रतिनिधी

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्यात बदलापूर तसेच इतर ठिकाणी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी आज  जिल्हाशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे.


खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवने,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी,तक्रार पेटी, सखी सावीत्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन,विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन,राज्य सदस्य विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती यांची अंमलबजावणी करण्याची मागणी भगवान चौधरी यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. दि.७ एप्रिल २०१६,दि.०५ मे २०१७, दि.१० मार्च २०२२,दि.१३ मे २०२२ व दिनांक २१ ऑगस्ट २०२४ च्या परिपत्रक कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये या कायद्या प्रमाणे तातडीने शिक्षणाधिकारी सो.यांनी पत्रव्यवहार करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जेणे करून अशा घटना भविष्यात घडणार नाही आणि जे संस्था चालक व मुख्याध्यापक हे शासनाच्या परिपत्रक ,आदेशाचे उल्लंघन करतील त्याच्या वर या कायद्याने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

No comments