adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तहसिलदार यांना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय लक्षवेध आंदोलनाचे निवेदन

चोपडा तहसिलदार यांना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे राज्यस्तरीय लक्षवेध आंदोलनाचे निवेदन चोपडा प्रतिनिधी  (संपादक :-हेमकांत गायकवाड)  ...

चोपडा तहसिलदार यांना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे राज्यस्तरीय लक्षवेध आंदोलनाचे निवेदन


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय लक्षवेध आंदोलन, मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या दि. २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत पुर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधात नसुन नाईलाजास्तव केवळ शासनाचे लक्ष वेधण्याच्या प्रामाणिक हेतुने दिनांक २४ सप्टेंबर २०२४ ला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन दिनांक २५ सप्टेंबर २०२४ पासुन राज्यभर कामबंद आंदोलन तसेच दिनांक २६ सप्टेंबर २०२४ पासुन आझाद मैदान, मुंबई येथे मागण्या पुर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन मध्ये जळगांव जिल्हा कोतवाल संघटना सहभागी होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले असुन दिलेल्या प्रसिद्ध पत्रकांत म्हटले आहे की 

आम्ही खालील सही करणार नाम्न पुर्वक निवेदन सादर करीतो की, मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मा. महसुल मंत्री साहेब यांचे निर्देशानुसार मंत्रालय स्तरावर कोतवाल संवर्गाची मुख्य मागणी चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या बाबत कार्यवाही चालु आहे. ती जलद गतीने पुर्ण होऊन आमच्या मागण्या पुर्ण व्हाव्यात यास्तव केवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना राज्यभर लक्षवेध आंदोलन करणार आहे त्यात जळगांव जिल्हा कोतवाल संघटना व जळगांव जिल्हयातील सर्व कोतवाल कर्मचारी सदर आंदोलन मध्ये सहभागी होणार आहे. कोतवाल हे ऐतिहासीक पद असुन पंरतु मानधनावर काम करणाऱ्या पदामध्ये कोतवाल व इतर पदे यांचे कामाच्या जबाबदाऱ्यामध्ये खुप मोठी तफावत आहे कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसुल गोळा करुन देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहाय्य करतो निवडणूक प्रक्रियामध्ये महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पार पाडतो. महसुल प्रशासनात नित्यनियमाची कामे व क्षेत्रीय कामे इमाने इतबारे पार पाडतो बरेच ठिकाणी तालुका स्तरावर शिपाई, संगणक चालक, टपाल ने- आण करणे, संकलनाची कामास सहाय्य करणे अशी विवीध प्रकाराचे कामे करीत आहे.या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. तर 

मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब, मा. उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार महसुल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्वातील शासन काळातच कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची ऐतिहासीक मागणी पुर्ण होऊन राज्यभरातील हाजोरो कोतवालांना न्याय मिळेल याचा आम्हास ठाम विश्वास आहे.

यावास्तव राज्यातील कोतवाल कर्मचारी कोठेही शासन विरोधी भुमीका नसुन केवळ शासनाचे लक्ष वेधण्याच्या हेतुने हे आंदोलन करीत आहे. त्यानुसार मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या दि. २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत पुर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधात नसुन केवळ शासनाचे लक्ष वेधण्याच्या प्रामाणिक हेतु दिनांक २४ सप्टेंबर २०२४ ला जिल्हास्तरावर धरणे आंदोलन दिनांक २५ सप्टेंबर २०२४ पासुन राज्यभर कामबंद आंदोलन व दिनांक २६ सप्टेंबर २०२४ पासुन आझाद मैदान, मुंबई येथे मागण्या पुर्ण होई पर्यंत धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना करणार असुन त्यात संपूर्ण जळगांव जिल्हयातील कोतवाल कर्मचारी सहभागी होणार आहे.

तरी महाशय आपणास विनंती आहे की, आम्हा सर्व कोतवाल संवर्गा विषयी नक्कीच सहानभुतीपुर्वक भुमिका असुन आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजुर होणे कामी आमचे निवदेन शासन दरबारी आपले मार्फत पोहचविण्यात यावे आम्ही आपले व शासनाचे नेहमी उपकृत राहु ही कळकळीची विनंती आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे 

No comments