आदिवासी कोळी महादेव जमातीला न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अमोल बावस्कार ,बुलढाणा (संपादक :-हेमकांत गायकवाड) मलकापूर:- आदीवा...
आदिवासी कोळी महादेव जमातीला न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
अमोल बावस्कार ,बुलढाणा
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- आदीवासी कोळी महादेव जमातीचे उपविभागीय अधिकारी कार्यालया मलकापूर समोर सुरु असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणास मा.पहाडसिंग दादा सुरडकर यांनी आज भेट देऊन त्या भेटी दरम्यान आदीवासी कोळी महादेव जमातीवर होणारा अन्याय आता सहन केल्या जाणार नसून आणि लवकरच लवकर जात प्रमाणपत्र वितरित न केल्यास बुलढाणा जिल्यात कोळी महासंघ च्यावतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे मंडपात उपस्थित जमात बांधवा समोर चर्चा दरम्यान सांगितले यावेळी सुनील कांडेलकर,गीताताई कटोरकर,ज्ञानदेव भोलणकर,तुकाराम झाल्टे,दादाराव कांडेलकर,विजय बाम्हदे,गंगाधर तायडे,गणेश इंगळे व असंख्य जमात बांधव उपस्थित होते.
No comments