अहमदनगरला प्रथमच महिला प्रधान जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक अहमदनगर (सचिन मोकळ):- (संपादक:- हेमकांत गायकवाड) अहमदनगर जिल्ह्याच्या प्रधान जिल...
अहमदनगरला प्रथमच महिला प्रधान जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक
अहमदनगर (सचिन मोकळ):-
(संपादक:- हेमकांत गायकवाड)
अहमदनगर जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीशाची नेमणूक झाली आहे.अहमदनगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरालगड्डा यांची अमरावती येथे बदली झाली.त्यांच्या जागी धाराशिव (उस्मानाबाद) येथून अंजू एस शेंडे यांची बदली झाली आहे.
नगरच्या दोनशे वर्षाच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती झाली आहे.१८ सप्टेंबरनंतर त्या सूत्रे स्वीकारतील.तसेच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थांनाच्या विश्वस्त समितीच्याही अध्यक्ष असतील.

No comments