सावद्यात गणेशोत्सव सर्वधर्म समावेशक असल्याचे आनंद - डिवाएसपी अन्नपूर्णा सिंह हर्षोल्लासात विघ्नहर्ता 'श्री' ची प्राणप्रतिष्ठापना ...
सावद्यात गणेशोत्सव सर्वधर्म समावेशक असल्याचे आनंद -डिवाएसपी अन्नपूर्णा सिंह हर्षोल्लासात विघ्नहर्ता 'श्री' ची प्राणप्रतिष्ठापना
रावेर प्रतिनिधी :- मोहसीन मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
सावदा येथे गणेशोत्सवात स्पर्धेऐवजी सर्वसमावेशकता असल्याने आनंदीत झाले सर्वानी एकत्रितपणे येवून कायद्याचे पालन करुन सावदा शहरातील सर्व गणेश भक्तांनी व मंडळानी भक्तीमय वातावरणात गुण्यागोविंदाने गणेशोत्सव हर्षोल्लासात साजरा करावा असे आवाहन फैजपुर उपविभागीय पोलिस अधिकारी तथा उप अधीक्षक अन्नापुर्णासिंग यांनी प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी केले."
सावदा येथील संभाजी महाराज मित्र मंडळ तर्फे सालाबादप्रमाणे चावडी परिसरात "गणपती बाप्पा मोरया च्या गजरात आकर्षक व भव्य श्री, गणेशमुर्ती ची प्राणप्रतिष्ठापना करण्याचे मान यंदा फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नापुर्णासिंह व माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांची कन्या सिमरन वानखेडे यांना मिळाला.यावेळी मान्यवरांसह गणेश भक्त बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.
सर्वात आधी येथे वरणगाव येथील देवदर्शनासाठी गेलेल्या भक्त गणांवर ओढवलेल्या दुखद घटनेबाबत व कोठारी शास्त्री भक्ती किशोरदास जी महाराज या दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर वानखेडे व अकोले परिवार आणि संभाजी मित्र मंडळाचे पदाधिकाऱ्यांकडून अन्नापुर्णासिंग मॅडम यांचा पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले.तसेच येथे उपस्थित सावदा पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक विशाल पाटील,कुर्बान मेंबर फैजपूर,माजी नगरसेविका सौ.रेखा वानखेडे,उपनगराध्यक्षा नंदाताई लोखंडे,माजी नगरसेवक सिद्धार्थ बडगे,शाम अकोले,निसार अहमद,हरी मामा,योगेश महाजन,साई वानखेडे इत्यादी महीला व पुरुष सह नागरिक उपस्थित होते.
संभाजी मित्र मंडळाने ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसाठी सोडला पथ मार्ग
योगायोग यंदा सप्टेंबर महिन्यात ईद-ए-मिलाद व गणेश उत्सव आल्याने संभाजी मित्र मंडळाचे नियोजित ठिकाण ऐवजी दोघा समाजामध्ये जातीय सलोखा कायम राहावा याकरिता माजी नगरसेवक फिरोज खान(लेफ्टी)व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व समावेशकतेला प्रथम प्रधान्य देणारे सदर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मंडळाच्या बैठकीत असे ठरले की,येत्या १६ तारखेला ईद-ए-मिलादची मिरवणूक मार्गस्थ करण्यासाठी सदर मंडळाने पथ मार्ग सोडून एक अनोखा उपक्रम राबविला असून,नेपाळ येथे दुर्घटनेत मयत झालेल्या व कोठारी भक्ती किशोरदास शास्त्री महाराज या सर्वांना खरी व भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मंडळांनी कोणतेच प्रकारचे वाद्य न लावता तसेच मिरवणुकीत सहभागी न होता.गणेश विसर्जन करण्याचे ठरवले.तरी वरील या सर्व कार्यक्रमाची संकल्पना माजी नगराध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे उपस्थितांसमोर प्रस्तावित करत असताना बोलून दाखवली.

No comments