adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

  मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. जळगाव प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) मा. श्री. महेश्वर रेड्डी, प...

 मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.


जळगाव प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

मा. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.असुन त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागुल, राहुल वैसाणे, प्रमोद ठाकुर सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.


वरील नमुद पथकातील पोह संदिप पाटील व प्रविण मांडोळे हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना माहिती मिळाली की, दिपक सुमाऱ्या बारेला रा. कर्जाणा ता. चोपडा हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे दोन दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. परंतु वरील नमुद पथकातील अमंलदार देखील तिथेच ठाणमांडून होते.


दिनांक ०८/०९/२०२४ रोजी दिपक सुमाऱ्या बारेला हा त्याचे घरी कर्जाणा येथे आला असून तो दुपारून गावातून पळून जाण्याचा मार्गावर असतांना सदरील नमुद पथकाने कर्जाणा गावाचे बाहेर मेलाणे गावाजवळ त्यास शिताफिने पकडून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक सुमाऱ्या बारेला, वय २९, रा.कर्जाणा ता. चोपडा जि. जळगाव असे सांगुन त्याचे जवळचे मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे जवळची युनीकॉर्न मोटार सायकल ही पाचोरा येथून चोरी केल्याचे सांगीतले. त्यावेळी त्यास अजुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने १) पाचोरा पो.स्टे. CCTNS NO ३९२/२०२४ भान्यासं ३०३(२), २) पाचोरा पो.स्टे. CCTNS NO ३९३/२०२४ भान्यासं ३०३ (२), ३) पारोळा पो.स्टे. CCTNS NO २८०/२०२४ भान्यासं ३०३(२), ४) मोहाडी ता.जि.धुळे पो.स्टे. CCTNS NO ५५/२०२१ भादवि ३७९ तसेच इतर २ मोटार सायकल धरणगाव व राजपुर जि. बडवाणी येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी दिपक सुमाऱ्या बारेला, वय २९, रा. कर्जाणा ता. चोपडा जि. जळगाव याचे कडून जप्त केलेल्या ६ मोटार सायकल सह वैद्यकिय तपासणी करून पुढील तपासकामी पाचोरा पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

No comments