adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा महाविद्यालयात ' राष्ट्रिय सेवा योजना' कार्यक्रमाचे अयोजन

  चोपडा महाविद्यालयात ' राष्ट्रिय सेवा योजना' कार्यक्रमाचे अयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड ) चोपडा: येथील महात्मा...

 चोपडा महाविद्यालयात ' राष्ट्रिय सेवा योजना' कार्यक्रमाचे अयोजन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक :- हेमकांत गायकवाड )

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 सप्टेंबर रोजी  राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. दिलीप बी. गिऱ्हे (समन्वयक,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना चोपडा विभाग ) प्रमूख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच माजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.के.एन. सोनवणे, माजी कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. पी. सपकाळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री.विशाल पांडुरंग हौसे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.के.डी.गायकवाड,महिला सहायक कार्यक्रमाधिकारी सौ. एस. बी. पाटील, सौ.एम.टी.शिंदे , डॉ सी.आर.देवरे आदि व्यासपिठावर उपस्थीत होतें.

      कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक काजल सोनवणे व स्वाती मिस्तरी यांनी स्वागत गीत सादर केले. तसेच पुनम पाटील, दिपाली अहिरे, विशाखा महाले या स्वयंसेविकांनी एनएसएस गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विशाल पांडुरंग  हौसे यांनी करुन हा एन एस एस स्थापना दिवस हा महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आहे.राष्ट्रीय सेवा योजनेची चळवळ 24 सप्टेंबर 1969 रोजी निर्माण करण्यात आली असे  एन एस एस स्थापना दिवसाची पार्श्वभूमी त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मांडली.

    कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिलीप बी. गिऱ्हे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात मागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाने महाविद्यालयातील शिक्षण घेत असताना समाज सेवा करावी.तसेच आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून घेऊन रचनात्मक कार्य करण्यावर भर देऊन समाजसेवेच्या माध्यमातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा असे मत त्यांनी मांडले. पुढील व्याख्यानात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यापीठ स्तरीय, राज्यस्तरावरील व केंद्र शासनाचे विविध मोहीमांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ डी.पी.सपकाळे यांनी देखील त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत आलेले विवीध अनुभव  त्यांनी कथन केले. कार्यक्रमाला उपस्थित डॉ.सी.आर देवरे यांनी विद्यार्थी दशेत असताना त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतील अनुभव व त्यांनी त्यातून घेतलेली प्रेरणा तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतून स्वयंसेवकांनी काय-काय शिकावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी समाजात मिसळण्यासाठी स्वयंसेवकांमध्ये ज्या गुणांची गरज असते या गुणांचा विकास महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांमधून स्वयंसेवकांनी करावा असे आवाहन केले. तसेच स्वयंसेवकांनी नेतृत्व गुण धारण करून लोकशाही प्रवृत्तीचा समाजात विकास करुन साक्षर आणि निरक्षर ही दरी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कमी करावी या बाबत मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमाचे आभार सौ एस. बी. पाटील यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments