adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्रातील अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी द्या..!

  महाराष्ट्रातील अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी द्या..!  अन्यथा आंदोलन तीव्र होईल  :  संस्थाचालक  समिती प्रदेश  अध्यक्ष बाबासा...

 महाराष्ट्रातील अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी द्या..! 

अन्यथा आंदोलन तीव्र होईल  :  संस्थाचालक  समिती प्रदेश  अध्यक्ष बाबासाहेब भोईटे


...............................

 चोपडा दि.२४( प्रतिनिधी )

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

 गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी मानधन तत्वावर पूर्ण वेळ काम करीत असून २४घंटे कामाला बांधील आहे. हजारों विद्यार्थी घडविण्यात मोलाची भूमिका निभावत असल्यावरही शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे तुटपुंज्या मानधनावर कुटुंब चालविणे जिकिरीचे झाले आहे.आता ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही . त्यामुळे आझाद मैदानावर पुकारण्यात आलेले बेमुदत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा संस्थाचालक  समिती प्रदेश  अध्यक्ष बाबासाहेब भोईटे यांनी दिला आहे.

 या आंदोलनासंदर्भात  मुख्यमंत्री कार्यालयातून  चौकशी कामी आत्ताच फोन येऊन गेला तसेच संचालक पुणेऑफिस मधूनही पीए चा फोन येऊन गेलेला आहे.त्यासंदर्भात बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.

      जोपर्यंत आपण वेतनश्रेणी देत नाही तोपर्यंत कर्मचारी आझाद मैदानावरील उपोषण सोडणार नाही सर्व संस्थाचालकांचा त्यांना पाठिंबा आहे वेळ पडल्यास सर्व संस्थाचालक आझाद मैदानावर उपस्थित राहतील व आंदोलन  तीव्र करतील असे  संबंधितांना भ्रमणध्वनीवरून बोलतांना सांगितले . दररोज आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत राहिल तरी 

कर्मचारी बाधवानी वेतनश्रेणी लागु होईल तो पर्यंत आझाद मैदान सोडु नये असे आवाहन

संस्थाचालक समिती चे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब भोईटे, अशोक शाह, जुमङे सर,

संजीव शिरसाठ सर चोपडा, भगवान मेढे भुसावळ, अनंतकुमार, पवन सुर्यवंशी, महेश शिरसाठ यांनी केले आहे.

No comments