कोळी महादेव जमातीच्या उपोषणाची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार अमोल बावस्कार , बुलढाणा (संपादक :- हेमकांत गायकवाड) मलकापूर:- उपविभागी...
कोळी महादेव जमातीच्या उपोषणाची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार
अमोल बावस्कार , बुलढाणा
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज चोथा था दिवस निघाला असून निगरगथ शासन व प्रशासन जाणीव पूरक दुर्लक्ष करत आहे आणि उपोषण कर्ते राजेंद्र रायभान धाडे यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली तरी या शासन ने व प्रशासनाने आदीवासी कोळी महादेव जमातीच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा उपोषण करत्याच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याचे गंभीर परिणाम शासन व प्रशासन यांना भोगावे लागतील असा इशारा आदीवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्धवरे देण्यात आला आहे.अरविंद भोलणकर,संदीप सपकाळ,ज्ञानदेव कांडेलकर ,गंगाधर तायडे गणेश इंगळे यांनी कळविले आहे
No comments