ज्ञानमंदीरात ज्ञानदानाने विद्यार्थी घडविण्याचे शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद- माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद सय्यद वसीम बानो वाहिद...
ज्ञानमंदीरात ज्ञानदानाने विद्यार्थी घडविण्याचे शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद- माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद
सय्यद वसीम बानो वाहिद असलम सेवानिवृत्त.
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी. रावेर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
येथील जि. प. उर्दू मुलांची शाळा न.2 रावेर येथील मुख्याध्यापक सय्यद वसीम बानो वाहिद असलम आपली 39 वर्ष सेवा पुर्ण करून आज सेवा निवृत्त झाल्या. त्यांच्या सन्मानार्थ आज DM marrage हॉल येथे भव्य निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले अध्यक्ष स्थानी लोकनियुक्त नगर अध्यक्ष दारा मोहम्मद होते. या वेळी त्यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक कार्य कर्तृत्ववात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील व विद्यार्थी घडविण्याचे कौशल्य कौतुकास्पद कार्य शिक्षकांच्या हाती असते ज्ञानमंदीरात ज्ञानदान करण्याचा शिक्षकांचा खरा ध्यास कौतुकास्पद आहे यावेळी केंद्र प्रमुख रईसुद्दिन सर, सर्व मुख्याध्यापक , उप शिक्षक, तसेच पत्रकार शकील शेख, नगर सेवक मोहम्मद आसिफ, नफिस सर, शाहीन परवीन, नूरजहाँ बाजी, गाजाला तबस्सूम, रिजवाना बाजी, पंचुरिया मेडम, शाळा व्यवस्थापण समितीचे पदाधिकारी, आशिक सर, गुलरेज सर,आदींनी मनोगत व्यक्त केले.झालेले निरोप समारंभ हे आपण केलेल्या कामाचा प्रमाणपत्र आहे .आपली यासशवी सेवा अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन रईस शेख यांनी केले. माझ्या 39 वर्ष च्या सेवेत आपण सर्वांननी मला दिलेल्या प्रेरणा सहकार्य, मार्गदर्शन, बद्दल अभिनंदन व आभार सय्यद वसीम बानो वाहिद असलम यांनी व्येक्त केले. विकारुद्दीन सर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी इद्रिस शेख, आसिफ खान, शाकीर शेख, सय्यद अन्सार , शकील खान यांनी परिश्रम घेतले.

No comments