adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बहुजन भारत पार्टीचे महाराष्ट्रात सरकार आल्यास सर्व अतिक्रमण धारक,भूमिहीन आणि झोपडी धारकांना पक्के घरे देऊ ..मा.व्यंकटेश कसबे साहेब . ( राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन भारत पार्टी )

  बहुजन भारत पार्टीचे महाराष्ट्रात सरकार आल्यास सर्व अतिक्रमण धारक,भूमिहीन आणि झोपडी धारकांना पक्के घरे देऊ .. मा.व्यंकटेश कसबे साहेब . ( रा...

 बहुजन भारत पार्टीचे महाराष्ट्रात सरकार आल्यास सर्व अतिक्रमण धारक,भूमिहीन आणि झोपडी धारकांना पक्के घरे देऊ ..

मा.व्यंकटेश कसबे साहेब . ( राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन भारत पार्टी ) ...........   


              . 
  

 वाशीम प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड )                       स्थानिक  वाशीम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि.22 / 09 / 2024 रोजी बहुजन भारत पार्टी तर्फे बहुजन एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटेश कसबे साहेब यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.


या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय मातंग संघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय वैरागडे साहेब , बहुजन भारत पार्टी वाशिम हिंगोली चे जिल्हा सचिव ब्रह्मानंद हनवते साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पडघान , डायमंड कोचिंग क्लासचे संचालक माधव डोंगरदिवे सर , दादाराव इंगोले, धोंडू राऊत यांची उपस्थिती होती 

तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बहुजन भारत पार्टीचे राज्य सचिव तथा विदर्भ प्रभारी विधानसभा ( इच्छुक उमेदवार वाशीम मंगरुळपिर विधानसभा ) युवा नेते जगदीश मानवतकर यांची उपस्थिती होती यावेळी बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष वेंकटेश कसबे साहेब यांनी उपस्थितीना मार्गदर्शन करताना म्हणाले की, '' येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाशिम मंगरूळपीर मतदार संघाचे संभाव्य उमेदवार जगदीश मानवतकर यांना भव्य मताने निवडून आना.

बहुजन भारत पार्टी ही शोषित वंचित बेघर भूमिहीन आणि कामगारांसाठी लढा देते तरी बहुजन भारत पार्टीचे महाराष्ट्रातील सर्व उमेदवार जर निवडून येतील तर सर्वात प्रथम अतिक्रमणधारक , बेघर,  भूमिहीन यांच्या घराचा प्रश्न सर्वप्रथम मार्गी लावू , सर्वांना पक्की  घरे देऊ . भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे आपल्याला मते मागताना आपल्या पाया पडतील परंतु त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आपले मत यांना विकू नका . कारण एका मताची किंमत काय आहे हे आपला उमेदवार जेव्हा निवडून येत नाही तेव्हा कळते . तेव्हा आपण आपले मत न विकता योग्य उमेदवाराला कारण मत्ता आपल्याला मतदान करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराला विसरू नका आणि आपले मतदान योग्य उमेदवाराला द्या. असे विचार मांडले तर जगदीश मानवतकर यांनी '' मला जर बहुजन भारत पार्टी तर्फे वाशिम मंगरूळपीर विधानसभाची उमेदवारी मिळाली तर नक्कीच संधीचा सोनं करेल आणि बहुजन भारत पार्टीची जागा वाशिम जिल्ह्यात निवडून आणेल .  असाच आशीर्वाद आपल्या पाठीमागे ठेवा आपल्या एक एक मताला नक्कीच योग्य मार्गी लावू.आपण मला निवडून दिल्यास अतिक्रमण धारक ,बेघर ,झोपडपट्टी धारक यांना नक्की  पक्के घरे देऊ.'' विचार मांडले.  यावेळी संजय वैरागडे साहेब यांनी '' बहुजन वर्ग एक आल्या शिवाय आपली सत्ता येणार नाही.तरी सर्व बहुजन वर्गाने एक यायला हवे .आपल्या न्याय,हकक आणि अधिकार यांच्यासाठी आपल्याला संघटीत व्हायला हवे.तरच आपले भविष्य  चांगले राहील ' असे विचार मांडले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बहुजन भारत पार्टीचे वाशीम जिल्हाप्रभारी गजानन कदम ,जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ शेळके,जिल्हा उपाध्यक्ष संजय पुंडसे,वाशीम जिल्हा अध्यक्ष ( महिला ) वंदनाताई भगत ,जिल्हा सचिव अक्षय इंगोले,जिल्हा उपसचिव अरुण कंकाळ,वाशीम ता.सचिव खडसे यांनी परिश्रम घेतले.तर यावेळी बहुजन भारत पार्टीचे व जगदिश मानवतकर समर्थक ग्रुपचे सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी आणि समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments