रावेर तालुक्यातील सिंगनूर येथे विद्युतखांबावर पडली वीज इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याने नुकसान रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक :...
रावेर तालुक्यातील सिंगनूर येथे विद्युतखांबावर पडली वीज इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याने नुकसान
रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
शुक्रवारी रोजी सायंकाळी दरम्यान रावेर तालुक्यातील सिंगनूर येथे विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली त्या दरम्यान गावातील इंदिरानगर वस्तीतील रहिवासी गणेश रघुनाथ पाटील यांच्या घराजवळ असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर पाऊस सुरू असतांना वीज कोसळल्यामुळे विद्युत खांबाशेजारील लगतच्या घरातील रहिवाशांचे फ्रिज टीव्ही, पंखे, सेटअप बॉक्स,यासह इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्याने नागरिकांचे हजारों रुपयांचे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर महावितरण कंपनीच्या डीपीचे नुकसान झाल्याचे कळते.

No comments