45 लाखाचा गांजा पकडला ; आरोपी फरार ग्रामिण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई चोपडा (प्रतिनिधी) (संपादक :-हेमकांत गायकवाड) चोपडा:- येथील ग्रामिण ...
45 लाखाचा गांजा पकडला ; आरोपी फरार ग्रामिण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई
चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
चोपडा:- येथील ग्रामिण पोलीस स्टेशन अंतर्गत 45 लाखाचा गांजा पकडण्यात आला.मात्र पोलिसांना गुंगूरा देवून आरोपी फरार झाला.असुन याबाबत ग्रामिण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मालापूर शिवारात नाबार्ड च्या कंपार्टमेंट 211 च्या शेतीतील लागवड असलेल्या गांजाची शेती कसत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून दिनांक सहा रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व त्यांची टीम घटनास्थळी गेली असता यांना सदरील शेतात गांजाची शेती करत असल्याचे दिसले यावरून त्या शेतीतील गांजाची रोप उपळुन काढले दिनांक सात रोजी सकाळी चार वाजेपर्यंत ही कारवाई चालली या कारवाईत 750 किलोग्रॅमचे ओला गांजा आढळला त्याची किंमत जवळपास 45 लाख रुपयांच्या घरात असावी असा अंदाज गुन्हा नोंद मध्ये केलेला आहे आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा राहणार डेडीया पाडा तालुका चोपडा यांच्या शेतात गांजाची शेती आढळून आली पोलीस गाडी आली असता हे आरोपीच्या लक्षात आल्याने आरोपी हा फरार होण्यात यशस्वी झाला याबाबत फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांचे फिर्यादीवरून आरोपी -रुमाल्या चेचऱ्या पावरा रा.डेडियापाडा ता.चोपडा यांच्या शेतात नाबार्डची जमीन कसत असलेल्या कम्पामेंट 211 या शेतात 750 किलो 450000 (पंचेचाळीस लाख ) रुपयांचा गांजा पकडला उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर , उपपोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे पो.हे.कॉ.गणेश मधुकर पाटील यांनी कारवाई केली
No comments