Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बचतगटाचे दीड लाख रुपये लुटणाऱ्या टोळीस एलसीबीने केले जेरबंद

  बचतगटाचे दीड लाख रुपये लुटणाऱ्या टोळीस एलसीबीने केले जेरबंद अहिल्यानगर (सचिन मोकळ) (संपादक :- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर...

 बचतगटाचे दीड लाख रुपये लुटणाऱ्या टोळीस एलसीबीने केले जेरबंद


अहिल्यानगर (सचिन मोकळ)

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात रस्ता आडवून बचतगटाचे 1 लाख 53 हजार 480/-रूपये लुटणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी रामेश्वर सुभाष जायभाये (रा.शेवगाव) हे क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लिमीटेड,शेवगाव येथे बचत गटाचे कलेक्शनचे काम करतात.दि. 01/10/2024 रोजी फिर्यादी हे मोटार सायकलवरून पाथर्डी तालुक्यातील विविध गावातील बचत गटाचे कलेक्शन करून शेवगावकडे जात असताना गाडेवाडी फाटयाजवळ मोटार सायकलवरून 3 अज्ञात इसमांनी फिर्यादीस मारहाण करून 1,53,480 रूपये रोख रक्कम जबरीने चोरून नेले याबाबत पाथर्डी पो.स्टे येथे गु.र.नं. 931/2024 बीएनएस कलम 309 (6), 3 (5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर,  यांना नमूद जबरी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संतोष लोढे, अतुल लोटके,सुरेश माळी,फुरकान शेख, अमृत आढाव,आकाश काळे,जालींदर माने, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ व महादेव भांड अशांचे पथक नेमुण आरोपींची माहिती घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. तपास पथक गुन्हयातील आरोपीची माहिती घेत असताना पोनि/श्री. आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा उध्दव तुकाराम पवार, रा.टाकळीमानमूर, ता.पाथर्डी याने त्याचे साथीदारासह केलेला असून सध्या ते फुंदेटाकळी,ता.पाथर्डी येथे थांबलेले आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन,आरोपीची  खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. पथकाने कोरडगाव शिवारात,फुंदेटाकळी, ता.पाथर्डी येथे जावुन,3 संशयीत इसमास ताब्यात घेऊन,पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव उध्दव तुकाराम पवार रा.गाडेवाडी, टाकळीमानूर,ता.पाथर्डी,विठठल तुकाराम पवार रा.गाडेवाडी, टाकळीमानूर,ता.पाथर्डी,रविंद्र उर्फ बंडू मच्छिंद्र घोडके रा.गाडेवाडी, टाकळीमानूर,ता.पाथर्डी असे असल्याचे सांगितले.त्यांचे कडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीकडून 1,20,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात  सॅमसंग कंपनीचा टॅब व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, व श्री.सुनिल पाटील,  उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments