Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वहदत ए इस्लामी हिंदद्वारे मानव गरिमा उदबोधन कार्यक्रम संपन्न

  वहदत ए इस्लामी हिंदद्वारे मानव गरिमा उदबोधन कार्यक्रम संपन्न रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी  संपादक हेमकांत गायकवाड  वहदत ए इस्लामी हि...

 वहदत ए इस्लामी हिंदद्वारे मानव गरिमा उदबोधन कार्यक्रम संपन्न


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

संपादक हेमकांत गायकवाड 

वहदत ए इस्लामी हिंद द्वारे भारतात ५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान अखिल भारतीय मानव गौरव अभियान सुरू आहे. यादरम्यान वहदत-ए-इस्लामी हिंद, रावेर द्वारे रबिऊल अव्वल महिन्यात पैगंबर

हजरत मोहम्मद (स.अ.व.सल्लम) जयंतीच्या निमितत्ताने रविवारी २९सप्टेंबर रोजी सकाळी नगर पालिका हॉल पावर हाउस येथे इस्लामचे शेवटचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद( स.अ.व.सल्लम) यांच्या जिवनावर आधारित उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मौलाना हाफीज फरहान यांनी पवित्र कुरआन पठनांनी केली. यात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात हजर होते. 

याप्रसंगी उपस्थितांना अ.वहाब मलीक,रावेर तालुका आमदार शिरीष चौधरी,डॉ संदीप पाटिल यांनी प्रबोधन केले. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या आधारे भौतिक विकास साधत असताना मानवाचे या युगात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पतन होतांना दिसत आहे. साम्राज्यवाद, बाजारवाद, भौतिकवादांमुळे मानव स्वार्थी व स्वयंकेन्द्री वृत्तीने ग्रासले आहे. समाजात शोषण, हत्या, गुन्हेगारी वृत्ती, स्त्रियांवर अत्याचार, मानवात भेदभाव सारख्या कृत्यात मानव लिप्त होत आहे. त्यामुळे जगाच्या या वर्तमान व्यवस्थेविरुद्ध आदर्श जीवन व्यवस्था आणि यासाठी पर्याय जरुरी झाले आहे. जगात अन्याय,अत्याचार,कुरीती दूर सारण्यासाठी ईश्वराच्या मार्गदर्शनात संपूर्ण जगासाठी जनकल्याणकारी व्यवस्था देणारे जगाचे उद्धारक पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.सल्लम)

यांचे आदर्श जीवन, जगाला दिलेले शांती, बंधुभावाचे संदेश, मानवतेची शिकवण जगाला कल्याणकारी मार्गावर नेण्यासाठी मजबूत पर्याय आहे. आजच्या समाजव्यवस्थेसाठी ही गरज ओळखून वहदत ए इस्लामी रावेर द्वारे पैगंबर हजरत मोहम्मद (सल्ल°) यांचे संपूर्ण मानव जातीसाठी उदधारक व कल्याणकारी जीवन आणि व्यवस्थेची माहिती देण्यासाठी हा मानव गरिमा उदबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यांची होती उपस्थिती या कार्यक्रमास आमदार शिरिष दादा चौधरी , आगार प्रमुख पठाण, उपकार्यकारी अधिकारी महावितरण दिलीप मराठे , माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, शितल पाटील , रमेश महाजन , प्रा . प्रकाश मुजूमदार , अड . एम.ए खान, अबिका व्यायाम शाळे चे भास्कर महाजन , माजी नगरसेवक आसीफ मोहंमद , शेख सादिक, असद खान, शेतकरी संघटनेचे रमेश पाटील, एनयूआय चे धनंजय चौधरी , जमाते इस्लामी चे शफीयोदिन सर , शेख ग्यास, युसूफ खान, यांचे सह मोठ्या संख्येने हिंन्दू मुसलीम बांधव उपस्थित होते . सूत्रसंचालन शेख उमर, आभार प्रदर्शन एजाज अहमद यांनी केले.

No comments