Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सी. बी. निकुंभ हायस्कुलचे प्रा. ईश्वर राजपूत यांना राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती व ई साहित्य विकसन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक

 सी. बी. निकुंभ हायस्कुलचे प्रा. ईश्वर राजपूत यांना राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती व  ई साहित्य विकसन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक चोपडा प्...

 सी. बी. निकुंभ हायस्कुलचे प्रा. ईश्वर राजपूत यांना राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती व  ई साहित्य विकसन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक


चोपडा प्रतिनिधी

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

चोपडा :- तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सी. बी. निकुंभ हायस्कुलच्या उच्च माध्यमिक विभागातील प्रा. ईश्वर राजपूत यांना मराठी विषयातील दर्जेदार व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत ११ वी व १२ वी गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

     सदर स्पर्धा ही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित  दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ चा पारितोषिक वितरण समारंभ

रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार, नवी दिल्ली येथील केंद्रीय सहसचिव अर्चना अवस्थी , राज्याचे  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आर विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, योजना कार्यालयाचे संचालक महेश पालकर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे संचालक  शरद गोसावी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ. माधुरी सावरकर, ज्योती शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. 

         श्री केसरकर म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी घडवणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तंत्रस्नेही शिक्षक हे काम प्रभावीपणे करू शकतात. तसेच अशा व्हिडिओ निर्मिती स्पर्धेद्वारे शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान सुधारण्यास मदत होणार आहे. तंत्रज्ञान युक्त अध्ययन अध्यापन प्रक्रिया वाढीस लागणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमोत्तम व्हिडिओंचे संकलन करून त्याचा प्रत्येक शाळेमध्ये प्रसार व प्रचार केला पाहिजे. त्यातून शिक्षण प्रक्रिया ही प्रगल्भ होणार आहे. 

   व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमधून राज्यस्तरावर विजयी झालेल्या ८४ उमेदवारांचा यावेळी  सत्कार कऱण्यात आला. माझी शाळा माझी परसबाग या उपक्रमात विजयी ठरलेल्या शाळांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.                 

  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसह शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सर्व विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी व्हिडिओ निर्मितीची स्पर्धेची अंमलबजावणी केली.  शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी  राज्यातील  शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांच्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची  स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली.   

राज्यांतील ४०८ तालुक्यात, ३६ जिल्ह्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर विषय व गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निवडण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर क्षेत्रीय अधिकारी व पुरस्कार प्राप्त शिक्षक यांची समिती गठीत करून अंतिम मूल्यमापन करण्यात आले. शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ साठी ३६जिल्ह्यातील ४०८ गटातील १८२२१ उमेदवारांचे पोर्टलद्वारे अर्ज प्राप्त झाले होते. प्रा.ईश्वर राजपूत यांना मिळालेल्या या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव  जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी. चौधरी, पर्यवेक्षक व्ही. ए. नागपुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments