adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चोपडा विधानसभा मतदार संघात ६१ कोटीची कामे मंजूर ! आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चोपडा विधानसभा मतदार संघात ६१ कोटीची कामे मंजूर !       आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रय...

 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात चोपडा विधानसभा मतदार संघात ६१ कोटीची कामे मंजूर ! 

     आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश


प्रतिनिधी....रविंद्र कोळी

(संपादक :-हेमकांत गायकवाड)

ग्रामीण भागातील ४० किमीचे रस्त्यांचा होणार कायापालट : आ. लताताई सोनवणे यांचा पाठपुरावा

चोपडा तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून, तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे चोपडा मतदार संघात ४०.५२० किमीच्या रस्त्यांसाठी ५६ कोटी ७० लक्ष व  देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी ७५ लक्ष असा एकूण सुमारे ६१ कोटी ४५ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे चोपडा व यावल  तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी  आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना धन्यवाद दिले आहे.

आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब व मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील यांचे आभार मानले आहेत


*मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामे*

१) गोरगावले बु. ते धनवाडी रस्ता ( २. ८०५ कि. मी - ४ कोटी १३ लक्ष )

२) मंगरूळ ते गोरगावले खू. रस्ता ( १. ९०० कि. मी - २ कोटी ८९ लक्ष ) 

३) तावसे बु.- मजरेहोळ ते रामा -११ रस्ता ( ६. ८४० कि.मी - ९ कोटी ४४ लक्ष )

४) देवगाव ते पुनगाव ( ४. ६२० कि. मी - ८ कोटी ३६ लक्ष )

५) चोपडा ते चहार्डी रस्ता ( ५. ३७५ कि.मी - ८ कोटी ९ लक्ष ) 

६) प्रजिमा ०५- चुंचाळे ते कर्जाने रस्ता ( ७. ५०० कि.मी - ११ कोटी ७९ लक्ष ) 

७) धानोरा ते मोहरद रस्ता ( ३. ७१० कि.मी - ३ कोटी २९ लक्ष ) 

८) दहीगाव ते मोहराळा रस्ता ( २. ९४० कि.मी - ३ कोटी ३९ लक्ष ) 

९) विरावली ते वढोदे रस्ता ( २. ८१० कि.मी - २ कोटी ३३ लक्ष ) 

१०) मनवेल ते पिळोदे खु. रस्ता ( २. ०२० कि.मी - २ कोटी ९५ लक्ष ) असा एकूण ६१ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

चोपडा मतदार संघात १० रस्त्यांच्या ४०. ५२० कि.मी रस्त्यांसाठी ५६ कोटी ७० लक्ष ९२ हजार  इतका निधी मंजूर करण्यात आला आहे व देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी ७५ लक्ष १ हजार एकूण सुमारे ६१ कोटी ४५ लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेलाआहे. यामुळे चोपडा व यावल तालुक्याच्या रस्त्यांचा कायपालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये  समाधान व्यक्त होत आहे. आ. सौ. लताताई सोनवणे व माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, ग्राम विकास मंत्री गिरीशजी महाजन साहेब व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब व मदत व पुनर्वसन मंत्री श्री. अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत.

No comments