स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी ता. चोपडा जि. जळगाव येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही ...
स्वातंत्र्य सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी ता. चोपडा जि. जळगाव येथे
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला.
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
सदरील स्वच्छता पंधरवाडा, 2024 विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन शामराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
दिनांक 20 सप्टेंबर रोजी विद्यालयात स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली.* तसेच कचरा वर्गीकरण तसेच चर्चासत्राच्या माध्यमातून मुख्याध्यापक श्री मोहन शामराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत घरोघरी स्वच्छता उपक्रम राबवण्यास आवाहन केले.यावेळी विविध स्पर्धां जसे की, पोस्टर्स स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
1 ऑक्टोबर रोजी, वर्डी गावात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणा देऊन ग्रामस्थांचे लक्ष वेधले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासो विनायकराव रामदास चव्हाण तसेच गावातील लोकप्रतिनिधींनी स्वच्छता रॅलीत सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. याप्रसंगी 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन शामराव चव्हाण, पर्यवेक्षक श्री आर बी साळुंखे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेतर बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनी परिश्रम घेत 'स्वच्छता ही सेवा' मोहीम यशस्वी पार पाडली..*
No comments