Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जलिल पटेल लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा विचारात?

  जलिल पटेल लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा विचारात? जलिल पटेल शब्बीर खान यावल:- (प्रतिनीधी ) संपादक हेमकांत गायकवाड  कोरपावलीचे माजी...

 जलिल पटेल लवकरच काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा विचारात?

जलिल पटेल

शब्बीर खान यावल:- (प्रतिनीधी )

संपादक हेमकांत गायकवाड 

कोरपावलीचे माजी सरपंच प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष जलील सत्तार पटेल हे गेल्या 25 वर्षापासून म्हणजे विद्यार्थी दशकापासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठ आहे त्यांनी पक्षात NSUI शाखाध्यक्ष NSUI तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सेवादल जिल्हाध्यक्ष 10 वर्ष सदस्य रुग्णकल्याण समिती ग्रामीण रुग्णालय यावल,सदस्य आत्मा समिती कृषी यावल तालुका 15 वर्ष विशेष कार्यकारी अधिकारी गावात मराठी मुलांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या साठी नवनवीन उपयोजना राबवल्या शालेय साहित्य वाटप स्नेहमेळावा कोणत्याही जयंती पुण्यतिथी च्या दिवशी विद्यार्थ्यांना अन्नदान, खाऊवाट केले अनेक वेळा शाळेत जाऊन विद्यार्थ्यानं सोबत जेवण करून त्यांचे मनोबल वाढविले 7 जून 2023 ला चक्रीवादळा मुळे शाळेचे तब्बल 60 पत्रे उडाली त्याच्या लगेच दुसऱ्या दिवसापासून तलाठीयांचे जवळ स्वतः हा बसून पंचनामा करून घेतला व शासकिय कार्यालयात जाऊन पाठपुरवठा केला शेवटी मुंबई ला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब यांच्या प्रयत्नमुळे तब्बल 12 लाख रुपये मंजूर करून आणले मंजूर काम झालेले असून सुद्धा जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्या ठेक्या घेण्याच्या वादात निधी मंजूर असून सुद्धा काम सुरू होत नव्हते त्यामुळे विद्यार्थी पालक गावकरी यांच्या मदतीने शाळेतच उपोषण केले आणि प्रशासनाला धारेवर धरून लगेच शिक्षणं विभागाच्या आदेशाने लगेच दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरवात करून दिली  गावात पीक संरक्षण सोसायटीत बिनविरोध संचालक बिनविरोध व्हा.चेअरमन म्हणून चांगल काम केलं गावात बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य एकाचवेळी बिनविरोध सरपंच,उपसरपंच पद ओबीसी महिला जागेवर भुषविले सरपंच पदाच्या 2 महिन्याच्या कारकीर्दीत गावातील सगळ्या समाजाच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूर्णपणे पेव्हर ब्लॉक बसवले महिलांसाठी शौचालये बनवले दलीत वस्तीत समाज मंदिराची दुरुस्ती केली गावात अनेक ठिकाणी रस्ते काँक्रीटीकरण केले पथदिवे आरोग्य यांची समस्या मिटवली पाणी व्यवस्थापन ,गटारी तालुक्यातून पंचायत समिती मार्फत त्यांच्या स्वतःच्या वार्ड क्रं 4 ला 100 टक्के करमुक्त करून तालुक्यातून प्रथम क्रमांक आणि 10 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र आणि पुरस्कार मिळवून दिला पण गेल्या महिन्यात त्यांना पोटाचा कर्करोग  झाला जळगाव जिल्ह्यातील आणि यावल तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या एकही नेत्याने त्यांची 25 वर्षाची निष्ठा असून सुद्धा मदत केली नाही मात्र साकळीचे समाजसेवक युनूससेठ पिंजारी यांनी पहिल्या दिवसापासून मुंबई पोहचवणे कामी आर्थिक मदत केली तसेच यावल शहर अध्यक्ष कदीरभाई खान यांनीही आर्थिक मदत केली आज त्यांच्या कोरपावली गावात गेले असता त्यांचे भाऊबंद समाजाचे लोक गावकरी मित्रमंडळी काँग्रेसच्या जिल्हा आणि तालुका नेत्यांवर प्रचंड नाराज असल्याचे दिसले गावात फेरफटका मारला असता गावातील 80 टक्के लोकांनी जलील ने पक्षासाठी निस्वार्थ पणे एकही ठेका एकही योजना याचा लाभ घेतला नाही आणि तालुक्यातील नेत्यांनी त्यांनी स्वाभिमानी राहून रात्र दिवस एक करून पक्ष वाढवला शेतकरी जोडले युवक जोडले दलीत अल्पसंख्यांक आदिवासी आणि इतर समाज जोडला विशेष म्हणजे आदिवासी तडवी समाजात जलील पटेल यांची क्रेझ असून ते तडवी समाजात प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात म्हणून तडवी समाजात जलील पटेल यांची लोकप्रियता खूपच जास्त आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं जलील पटेल यांनी काँग्रेस पक्षासाठी जीवनाच्या 43 वर्षा पैक्की 25 वर्ष भर जवानीची दिली पण आज त्यांच्यावर भयंकर आजारामुळे त्यांच्या सह त्यांच्या कुटुंबियांवर ही वाईट वेळ आली तर जिल्हयातील तालुक्यातील पदाधिकारी यांचं कर्तव्य असताना सुद्धा मदत केली नाही असे अनेक गावकऱ्यांनी त्यांच्या समाजातील लोकांनी त्यांच्या भाऊबंदांनी मित्रमंडळी यांनी बैठक घेऊन यापुढे काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवारांना गावातून मतदान न करण्याचा एकमताने निर्णय झाला आणि जलीलदादा सुद्धा एकदम मस्त बरे होऊन काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेणार आहे प्रदेश काँग्रेसचे नेत्यांनी केली मदत जलील पटेल टाटा हॉस्पिटल मध्ये अडमीत असताना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नाना पटोले साहेब यांनी जलील पटेल यांना कॉल करून तब्बेतीची विचारपुस करून तुझा सोबत कोण कोण आले त्यांना फोन दे अस सांगितलं मग त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या त्यांचे पुणे येथील भाचे हाजी रईस पटेल व त्यांचे धामणगाव येथील शालक रियाज पटेल यांचाही चर्चा केली व टाटा हॉस्पिटल च्या डायरेक्टर यांना मी फोन केला आहे तुम्ही थर्ड फ्लोवर जाऊन त्यांना भेटायला सांगितले कारण नाना पटोले साहेब आधीच डायरेक्ट शी फोन वर बोलले होते व माझा जलील पटेल नावाचा कार्यकर्ता तिथं तुमच्याकडे टाटा हॉस्पिटल मध्ये दाखल आहे त्यांच्या वर तुमच्या डॉक्टरांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या त्यांचे भाचे आणि शालाक जेव्हा डायरेक्ट साहेबाना भेटायला गेले तेव्हा त्यांनी फाईलवर 80 लाखा पर्यंत खर्च फ्री आणि गोळ्या औषध मध्ये 75 टक्के सूट असा NOC वर सही करून दिली आणि नानांना मुळे जलील पटेल यांची टाटा हॉस्पिटल ची ट्रीटमेंट पूर्ण झाली त्यामुळे जलील पटेल ने नानाभाऊ पटोले साहेब यांचे आभार मानले आणि नेता असावा तर नाना पटोले साहेब सारखा अस सांगितलं

No comments