प्रदूषण मुक्त दीपावली २०२४ .....संकल्प प्रतिनिधी शिरपूर (संपादक :- हेमकांत गायकवाड) आज दिनांक २६/१०/२०२४ शनिवार रोजी न. प.शाळा क्र.३ शिर...
प्रदूषण मुक्त दीपावली २०२४
.....संकल्प
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २६/१०/२०२४ शनिवार रोजी न. प.शाळा क्र.३ शिरपूर येथे प्रदूषण मुक्त दीपावली उत्सव राबविण्याचा संकल्प करण्यात आला. भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे दीपोत्सव. असत्यावर सत्याचा विजय, म्हणजे दीपावली, अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दीपावली, भारतामध्ये ह्या सणाला ऐतिहासिक सामाजिक आर्थिक व धार्मिक महत्त्व आहे म्हणून. विद्यार्थ्यांनी आकाश कंदील स्वतः बनवून आणलेत. तसेच वर्ग सजावट करून नवीन पोशाख परिधान करून विद्यार्थी शाळेत आले तसेच या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्रातील शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना दीर्घकालीन सुट्ट्यांचा अभ्यास देण्यात आला तसेच या सणाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रम मुख्याध्यापक श्री पावरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री इंगोले सर,श्री. मयूर लोहार सर सूर्यवंशी मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी खरे मॅडम यांच्या परिश्रमामुळे यशस्वी करण्यात आले.
No comments