Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

 सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड  (संपादक :- हेमकांत गायक...

 सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथे आज दिनांक 2 t ऑक्टोंबर 2024 रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी  प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे मॅडम उपस्थित होत्या तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर आर व्हीं भोळे सरदार वल्लभ भाई पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय ए ऐन पूर हे होते. तसेच डॉ. नरेंद्र मुळे सर उपस्थित होते  प्रमुख पाहुणे भोळे सर यानी महात्मा गांधी यांच्या विचारांवर थोडक्यात प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषणामध्ये डॉ. वानखेडे मॅडम महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विषयीचे विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.प्रतिभा पाटील यांनी केले.डॉ.नारायण खडके यांच्या प्रेरणेने आजचा कार्यक्रम घेण्यात आला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहकार्य केले तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी व प्रथम आणि व्दितीय वर्षाचे विद्यार्थी यानी परिश्रम घेतले.

No comments