Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपुरात महाराजा अग्रसेन जयंती निमित्त प्रतिमापूजन

  फैजपुरात महाराजा अग्रसेन जयंती निमित्त प्रतिमापूजन  रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी  (संपादक:- हेमकांत गायकवाड)   यावल तालुक्यातील फैजप...

 फैजपुरात महाराजा अग्रसेन जयंती निमित्त प्रतिमापूजन 


रावेर प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी 

(संपादक:- हेमकांत गायकवाड)

 यावल तालुक्यातील फैजपूर शहरात आशा परशुराम अग्रवाल  या परिवाराकडे  अग्र शिरोमणी अग्रप्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंती निमित्त प्रतिमा गुरुवारी  पूजन करण्यात आले. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे हस्ते प्रतिमापूजन पुष्पहार अर्पण करण्यात आला. कै देविदास टीकाराम  चौधरी नागरी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रशेखर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दुसाने, सामाजिक कार्यकर्ते संदीप गोटू भारंबे यांच्या हस्ते ही प्रतिमा पूजन करण्यात आले. आशा अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, दिशा अग्रवाल यांची उपस्थिती होती. 


 महाराजा अग्रसेन यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी समाजासाठी मोठी तपश्चर्या करून महान आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांनी केलेले कार्य, विचार, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने राष्ट्र पुरुषांची जयंती साजरी करून आदर्श निर्माण करावा असे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी यावेळी सांगितले.

No comments