लोनवडी येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक :-हेमकांत गायकवाड) मलकापूर:- तालुक्यातील ग्र...
लोनवडी येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक :-हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- तालुक्यातील ग्राम लोनवडी येथे दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती अती उत्सवात डिजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली कोळी महादेव जमातीच्या वतीने हि मिरवणूक काढण्यात आली असून सर्व जमात बांधव तसेच गावातील नागरिक यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली
महिला,पुरुष,लहान मुलं,मुली देखील महर्षी वाल्मिकी जयंतीत वेगवेगळ्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते.वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते.ते आद्यकवी म्हणून प्रसिद्ध आहेत रामायण हे एक हिंदू धर्माचे महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य,साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते.त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते.
No comments